अडवाणींची रथयात्रा समस्तीपूर मध्ये अडवणाऱ्या लालूंच्या कन्येच्या तोंडी आता आली हिंदू सनातनी भाषा!!

विशेष प्रतिनिधी

पाटणा : देशभरात उसळलेली हिंदुत्वाची लाट पाहून भले भले पुरोगामी “सरळ” झाले आहेत. राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्या तोंडी सॉफ्ट हिंदुत्वाची भाषा आलीच आहे, पण आता त्यामध्ये लालू कन्येचीही भर पडली आहे. बिहारच्या समस्तीपूर मध्ये लालकृष्ण अडवाणींचा राम रथ रोखणाऱ्या लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसाभारती यांच्या तोंडी सनातनी हिंदू धर्माची भलामण करणारी भाषा आली आहे. Ram temple has been built in Ayodhya, it is not only the property of BJP and RSS

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर बांधले असेल, पण ती मोदी किंवा भाजपची प्रॉपर्टी थोडीच आहे?? आम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊ शकतो. आम्ही देखील सनातनी हिंदू आहोत. आम्ही पूजाअर्चा करतो, पण सध्या निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने आम्हाला वेळ नाही. पण ज्यावेळी वेळ मिळेल, तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हाला तिथे जायला कोणी अडवू शकत नाही, असे वक्तव्य मिसा भारती यांनी केले.

या त्याच मिसा भारती आहेत, ज्यांचा जन्म लालूप्रसाद यादव आणीबाणीच्या विरोधात तुरुंगात असताना झाला. आणीबाणीतील मिसा कायद्याखाली लालूप्रसादांना अटक झाल्याने त्या अटकेची आठवण म्हणून त्यांनी आपल्या या कन्येचे नाव मिसा ठेवले. या मिसा भारतींना आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपण सनातनी हिंदू असल्याची आठवण झाली आहे.

– अडवाणींचा रथ समस्तीपूर मध्ये अडवला

पण त्यांचे पिताश्री लालूप्रसाद यादव यांनी 1990 लालकृष्ण अडवाणींचा समस्तीपूर मध्ये अडकून धरला होता. तेथे त्यांनी अडवाणींना अटक करून ठेवले होते. त्यावेळी लालूप्रसाद राम मनोहर लोहिया यांचे समाजवादी शिष्य होते. बिहारचे मुख्यमंत्री होते आणि त्यांची उत्तर प्रदेशचे त्यावेळचे मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्याशी राजकीय स्पर्धा होती. लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा काढली होती. अडवाणींना अटक करण्याचे श्रेय मुलायम सिंह यादव यांना मिळू नये, यासाठी लालूप्रसाद यादव यांनी बिहारच्या समस्तीपूर मध्येच अडवाणींची रथयात्रा अडवली आणि त्यांना अटक केली होती. त्यावेळी लालूप्रसाद यादव यांना ते सनातनी हिंदू असल्याचे भान शिल्लक राहिलेले नव्हते. पण 2024 मध्ये संपूर्ण देशभर हिंदुत्वाचे वातावरण पसरले असताना भल्या भल्या समाजवादी आणि पुरोगामी यांना सॉफ्ट हिंदुत्वाचा “ताप” आला आहे आणि त्या तापातच ते आपण सनातनी हिंदू असल्याचे बडबडत आहेत. मिसा भारतींचे वक्तव्य याच “तापाचा” परिणाम आहे!!

Ram temple has been built in Ayodhya, it is not only the property of BJP and RSS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात