विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : देशात राम भक्तीची लाट वगैरे काही आलेली नाही. अयोध्यातल्या राम जन्मभूमी मंदिरात जे काही घडले, नरेंद्र मोदींचे फंक्शन होते. त्या पलीकडे काही नाही, अशी दर्पोक्ती काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आसाम मधल्या भारत जोडो न्याय यात्रेत केली.Ram devotion in the country; Rahul Gandhi’s appearance in Bharat Dodo Nyaya Yatra!!
संपूर्ण देशभर राम जन्मभूमी मंदिर लोकार्पणाचा प्रचंड उत्साह पसरला असताना राहुल गांधींनी अशी दर्पोक्ती करणे फार मोठे राजकीय किंमत काँग्रेसला चुकवावी लागण्याची शक्यता आहे, तरीदेखील राहुल गांधींनी आपलाच मुद्दा पुढे रेटत काँग्रेसच सर्वांना समान न्याय देईल, असा दावा केला आहे.
राम जन्मभूमी मंदिरात बालक रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देशभर आणि जगभर प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राम भक्तीला उधाण आले आहे. या वातावरणाकडे तुम्ही कसे पाहता??, असा प्रश्न पत्रकारांनी राहुल गांधींना विचारला त्यावर राहुल गांधी यांनी देशात राम भक्तीची लाट वगैरे काही नाही. “ते” केवळ नरेंद्र मोदींचे फंक्शन होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने नेहमीप्रमाणे त्याचा गाजावाजा केला. पण काँग्रेसकडे सर्व जनतेला न्याय देण्याचे पाच कार्यक्रमात ते आम्ही लोकांसमोर मांडतो आहोत, असे उत्तर दिले.
तुम्ही अयोध्येला जाणार का??, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रा आपल्या मार्गाने जाईल. या यात्रेच्या मार्गावर अयोध्या येत नाही. त्यामुळे तिथे जाणार नाही. भारत जोडो यात्रेचा उद्देश लोकांना न्याय देण्याचा आहे, ती यात्रा त्याच मार्गाने पुढे जाईल, असे उत्तर दिले.
वास्तविक राम मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाचे निमंत्रण राम जन्मभूमी ट्रस्टने राम मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाचे निर्माण करण सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरी या नेत्यांना दिले होते. परंतु, या नेत्यांनी ते निमंत्रण फेटाळले. काँग्रेसचे उत्तर प्रदेशातले दोन नेते स्वतःच्या व्यक्तिगत अधिकारात कार्यक्रमाला उपस्थित राहिले. परंतु काँग्रेस पक्षाने कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. आता तो बहिष्कार राम भक्तीच्या विरोधात परिवर्तित झाला असून तो राहुल गांधींच्या तोंडून बाहेर आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App