Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी ‘या’ दोन राज्यात भाजपाने तीन उमेदवार केले जाहीर

BJP Foundation Day Amit Shah-JP Nadda Wishes Party workers, PM Modi will address

24 जुलै रोजी गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोवा या तीन राज्यांमध्ये राज्यभा निवडणूक होत आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोवा या तीन राज्यांमध्ये  24  जुलै रोजी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी भाजपाने आता आपले पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे. भाजपने बुधवारी तीन राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले. गुजरातमध्ये दोन आणि पश्चिम बंगालमध्ये एका उमेदवाराचे नावं जाहीर करण्यात आली आहेत. Rajya Sabha Election BJP announced three candidates for Rajya Sabha election

भाजपाने गुजरातमधून बाबूभाई जेसंगभाई देसाई आणि केसरी देवसिंग झाला, तर पश्चिम बंगालमधून ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशन (GCPA) नेते अनंत राय ‘महाराज’ यांना उमेदवारी दिली आहे. बुधवारी, भाजपने अधिकृत प्रसिद्धीद्वारे उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यात एकूण 10 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी 24 जुलै रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 जुलै असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 जुलै आहे.

Rajya Sabha Election BJP announced three candidates for Rajya Sabha election

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात