राहुल गांधींच्या वक्तव्यावर लोकसभेत गदारोळ; भाजपा खासदार आक्रमक, कामकाज उद्यापर्यंत तहकूब

जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही केली.

विशेष प्रतिनधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या लंडन दौऱ्यादरम्यान भारताच्या लोकशाहीशी संबंधित वक्तव्याचा भाजपा सातत्याने निषेध करत आहे. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करत भाजपा खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. Rajya Sabha adjourned till 2 pm amid ruckus on Rahul Gandhi democracy remarks

आज केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सभापतींकडे राहुल गांधी यांनी परदेशात केलेल्या वक्तव्याबद्दल सभागृहात माफी मागावी अशी मागणी केली. ते म्हणाले, “ही खूप गंभीर समस्या आहे. यावर कठोर कारवाई व्हायला हवी. सभागृहाचा एक सदस्य ज्या प्रकारे परदेशात जाऊन भारताच्या संसदेचा अपमान करतो. त्यांना हा देशाचा अनादर वाटत नसेल व ते असेच वागत राहिले तर ते जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात यावे. यावेळी भाजपा खासदारांनी ‘राहुल गांधी माफी मागा’ अशा घोषणा देत सभागृहाचे कामकाज रोखले. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.


महाराष्ट्र सत्तासंघर्ष : बहुमत चाचणीला जे सामोरे गेलेच नाहीत, ते राज्यपालांना विचारताय बहुमत चाचणीचे आदेश का दिले? – तुषार मेहता


याशिवाय आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्य हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत वेलमध्ये आले. त्यांनी अदानी समूहाने केलेल्या कथित स्टॉक फेरफारची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी केली होती.  याचबरोबर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार सदस्यांना त्यांच्या जागेवर परत जाण्याचे आणि सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “हे सभागृह चर्चा आणि संवाद साधण्यासाठी आहे. धोरणाबद्दल बोलूया आणि लोककल्याणाच्या मुद्द्यांवर चांगली चर्चा करूया. जनतेचे कल्याण करायचे असेल आणि या सभागृहाला लोकशाहीचे मंदिर मानायचे असेल, तर किमान या  सभागृहावर भाष्य करू नका, अशी माझी विनंती आहे.”

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही या अगोदर काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.”भारताकडे G 20 चं अध्यक्षपद आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे अशावेळी भारतातला एक खासदार विदेशात जाऊन भारतावर टीका करत असेल, देशाचा अपमान करत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही.” असं ते म्हणाले आहेत.

Rajya Sabha adjourned till 2 pm amid ruckus on Rahul Gandhi democracy remarks

 

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात