वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Rajnath सरक्रीक प्रदेशात पाकिस्तानच्या लष्करी उभारणीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, पाकिस्तानच्या कोणत्याही कृतीला इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलेल असे उत्तर दिले जाईल. संरक्षणमंत्र्यांनी ‘शस्त्रपूजा’निमित्त एका जाहीर कार्यक्रमात हे विधान केले.Rajnath
सिंह म्हणाले की भारताची सीमापार दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच राहील. त्यांनी १९६५ च्या युद्धाची आठवण करून दिली. भारतीय सैन्य लाहोरला पोहोचले होते. पाकने हे लक्षात ठेवावे की कराचीला जाणारा एक मार्ग खाडीतून जातो.Rajnath
सरक्रीक कुठे आहे?
गुजरातमधील कच्छ व पाकिस्तानमधील सिंध यांना जाेडणारा समुद्राशी संबंधित ९६ किलोमीटर लांबीचा दलदलीचा पट्टा आहे. १९१४ च्या ब्रिटिश कराराने सीमा स्पष्टपणे निश्चित केली नव्हती. भारताचा दावा आहे की सीमा मध्यरेषेवरून जाते तर पाकिस्तान संपूर्ण खाडीवर दावा करतो.
ते सागरी सीमेजवळ आहे. त्यामुळे कराची व गुजरातमध्ये प्रवास करणे सोपे होते. येथे वायू व तेलाचे साठे आणि मत्स्यसंपत्ती आहे.
सीमा ओलांडल्यानंतर दोन्ही देशांतील मच्छीमारांना वारंवार अटक केली जाते. तणाव आणि सुरक्षा धोके वाढतात.
पाकिस्तानने राह-दे-पीर येथील मरीन पोस्टवर १ बरॅक बांधले. तेथे सुमारे ६४ लोकांना आश्रय दिला. पाक बीएसएफच्या हालचालींवर ड्रोनने लक्ष ठेवतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App