दक्षिणेत धुमाकूळ घातलेल्या “जेलर”ची आता युपी मध्ये क्रेझ; योगींबरोबर स्वतः रजनीकांत पाहणार सिनेमा!!


वृत्तसंस्था

लखनौ : दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांच्या “जेलर” सिनेमाने दक्षिण भारतात धुमाकूळ घातला आहेच. बॉक्स ऑफिसवर तो प्रचंड हिट झाला आहे, पण आता ही क्रेझ उत्तरेत देखील पोहोचली आहे. कारण रजनीकांत जेलर सिनेमा पाहण्यासाठी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ पोचले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर रजनीकांत “जेलर”चा शो बघणार आहेत. Rajinikanth himself will watch the movie with Yogi

लखनौ विमानतळावर पोहोचताच रजनीकांत यांनी स्वतःच ही माहिती पत्रकारांना दिली. रजनीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. त्यांची “पॉलिटिकल केमिस्ट्री” चांगली जुळते. महाराष्ट्रात देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर रजनीकांत यांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे हिंदुत्ववादी नेत्यांची जवळीक हे दक्षिणेतल्या सुपरस्टार रजनीकांत यांचे राजकीय वैशिष्ट्य राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर आपला “जेलर” हा सिनेमा दक्षिणेत सुपर हिट झाला. बॉक्स ऑफिसवर त्याने धुमाकूळ घातला. आता हाच सिनेमा घेऊन रजनीकांत उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. तेथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर हा सिनेमा पाहिल्यानंतर “जेलर”ची क्रेझ उत्तर प्रदेशसह हिंदी पट्ट्यात वाढणार आहे. यात व्यावसायिक गणितांबरोबरच राजकीय – सामाजिक गणिते देखील तितकीच दडली आहेत.

तामिळनाडूत भाजपचा पायरोवा

तामिळनाडूमध्ये भाजपने आपला पाया मजबूत करण्याचा इरादा पक्का केला आहे. भाजपचे तिथे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई सध्या संपूर्ण राज्याच्या पदयात्रेवर आहेत. या पार्श्वभूमीवर रजनीकांत उत्तर प्रदेशात येऊन योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर “जेलर” सिनेमा पाहणे याला राजकीय दृष्ट्या देखील विशेष महत्त्व आहे. याआधी तमिळ – काशी संगम अशा उपक्रमांमध्ये देखील रजनीकांत सहभागी झाले आहेत.

Rajinikanth himself will watch the movie with Yogi

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!