विशेष प्रतिनिधी
जयपूर : “दोन बायका, फजिती ऐका” ही सर्वसामान्य मराठी म्हण आहे. तसा एक मराठी सिनेमा देखील आहे, पण राजस्थानात मात्र, “दोन बायका, फजिती ऐका” ही म्हण बदलून “दोन बायका, तरीही उमेदवारी मिळवा!!”, अशी झाली आहे. कारण राजस्थान विधानसभा निवडणुकीत 7 उमेदवार असे आहेत, की ज्यांना प्रत्येकी दोन बायका आहेत आणि तीन पेक्षा जास्त अपत्ये आहेत. यात पक्षीय अपवाद नाही. कारण काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी दोन – दोन बायकांच्या दादल्यांना उमेदवारी दिली आहे. rajasthan vidhansabha election 2023
राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये काही रंजक बाबी पुढे आल्या आहेत. काही उमेदवारांना दोन-दोन बायका आहेत तर काही उमेदवारांना पाचपेक्षा जास्त मुलं आहेत.
मेवाड-वागडमधील 28 पैकी 6 जागांवर, असे 7 उमेदवार आहेत, ज्यांना प्रत्येकी दोन पत्नी आहेत. प्रतापगड मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी दोन बायका आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे.
प्रतिज्ञापत्रांमधून आणखीही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. तीन उमेदवारांना तब्बल 5 पेक्षा जास्त मुलं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. यामध्ये झाडोल येथील काँग्रेसचे हिरालाल दरंगी यांना ७ तर भाजपचे बाबूलाल खराडी यांना ५ मुले आहेत. खेरवाडा येथील भाजपचे नानालाल अहारी यांना ६ मुले आहेत.
दोन पत्नी असलेल्या उमेदवारांमध्ये उदयपूरच्या वल्लभनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयलाल डांगी यांना दोन पत्नी आहेत, तर खेरवाड्यातील काँग्रेसचे उमेदवार दयाराम परमार आणि झडोल येथील काँग्रेसचे उमेदवार हिरालाल दरंगी यांनाही प्रत्येकी दोन पत्नी आहेत. प्रतापगडमध्येही भाजपचे हेमंत मीणा आणि काँग्रेसचे रामलाल मीणा यांनीही उमेदवारी अर्जासोबत शपथपत्रात याचा उल्लेख केला आहे.
यासह बांसवाडा जिल्ह्यातील गढी येथील भाजपचे उमेदवार कैलाशचंद मीना आणि घाटोल येथील काँग्रेसचे उमेदवार नानलाल निनामा यांनासुद्धा दोन बायका आहेत. आदिवासी समुदायामध्ये बहुपत्नीत्व अजूनही रुढ आहे. इथे काही लोकांना 2 तर काहींना 3 बायका असणे प्रतिष्ठेचे आणि सामान्य मानले जाते. त्यामुळे राजस्थानातल्या जनतेला त्याचे फारसे काही वाटत नाही. या पैकी कोणीही उमेदवार निवडून आले तरी दोन बायकांचे दादलेच तिथले आमदार असणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App