अजब गजब राजस्थान; गेहलोतांच्या मंत्र्याने चांद्रयानातून पाठवून “यात्री”, त्यांना केला सलाम!!


विशेष प्रतिनिधी

जयपूर : अजब गजब राजस्थान; गेहलातांच्या मंत्र्याने चांद्रयानातून पाठवून “यात्री”, त्यांना केला सलाम!!, असे खरंच काल राजस्थान मध्ये घडले. भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली. चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षित उतरले. त्यानंतर समस्त भारत यांना अत्यानंद झाला. संपूर्ण देशभरात काल जल्लोषाचे वातावरण होते. Rajasthan sports minister made stupid remarks on Chandrayaan 3, sent “yatris” in unmanned mission

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी भारतीय वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन केले, पण काही कार्यकर्ते अति उत्साहात काहीबाही बोलून बसले. असेच राजस्थानच्या एका मंत्र्याचे झाले. अशोक गहलोत यांच्या मंत्रिमंडळातील क्रीडामंत्री अशोक चांदना हे असे काही बोलून बसले की सगळ्यांनी नंतर डोक्याला हात लावला.

अशोक चांदना म्हणाले :

उन्होंने कहा, ”हम कामयाब हुए और सेफ लैंडिंग हुई…तो जो यात्री गए हमारे, उनको सलाम करता हूं. हमारा देश एक कदम और साइंस व स्पेस रिसर्च में आगे बढ़ा, उसके लिए सभी देशवासियों को बधाई देता हूं.”

याचा अर्थ चांद्रयानाच्या सफल मोहिमेबद्दल त्यांनी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले, पण त्या चांद्रयानात यात्री जे गेले, त्यांना मी सलाम करतो, असे अशोक चांदना म्हणून बसले. वास्तविक भारताची चांद्रयान मोहीम मानव रहित आहे. त्यात कोणीही मानव अथवा अन्य प्राणी पाठवलेला नाही. पण याचे साधे भान देखील अशोक चांदना यांच्यासारख्या मंत्र्यांना उरले नाही आणि ते परस्पर चांद्रयानात यात्री “पाठवून” बसले, वर त्यांना सलामही करून टाकला. त्यामुळे नेटिजन्स अशोक चांदना आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांची जोरदार खिल्ली उडवत आहेत.

Rajasthan sports minister made stupid remarks on Chandrayaan 3, sent “yatris” in unmanned mission

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!