‘’काँग्रेसने आधी स्वत:चे घर सुस्थितीत आणावे आणि नंतर राज्य सुरळीत करण्यासाठी पुढे जावे.’’ असा टोलाही लगावला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजस्थानसह पाच राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस-भाजपासह अन्य पक्षांचे नेते निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. त्याचवेळी भाजपानेही या निवडणुकांबाबत रणनीती आखण्याची कसरत सुरू केली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या राज्यांमध्ये भाजपा स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान राजस्थानमध्ये मुख्यमंत्रपदाचा चेहरा कोण असणार? या प्रश्नाचं उत्तर राज्य प्रभारींनी दिलं आहे. Rajasthan Election 2023 Who will be the Chief Ministerial face of BJP in Rajasthan
कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करण्यात येणार नाही. म्हणजेच एकत्रितपणे सर्व नेते निवडणूक लढवणार आहेत. विजयानंतर केंद्रीय नेतृत्व यावर विचारमंथन करणार आहे. राजस्थानमध्ये दलित, मागास आणि महिलांनाही निवडणुकीचा मुद्दा बनवण्यात येणार आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अरुण सिंह म्हणाले की, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले जाणार नाही. राज्यांचे स्थानिक प्रश्न लक्षात घेऊन पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत. मात्र, मध्य प्रदेश आणि मणिपूरमधील मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत ते उघडपणे बोलले नाहीत.
मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार का, असा प्रश्न त्यांना माध्यमांनी विचारला. यावर भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि सर्व वरिष्ठ राज्यस्तरीय नेते आणि स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली जाईल. काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे.
राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह पुढे म्हणाले की, भाजपा राज्यातील काँग्रेसच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करेल. पेपरफुटी, भ्रष्टाचार, तुष्टीकरण असे अनेक मुद्दे असून काँग्रेसने जनतेची फसवणूक केली आहे. या मुद्य्यांवरून भाजपा नेते निवडणुकीपूर्वी घरोघरी जातील. यावेळी अरुण सिंह यांनी पायलट आणि गेहलोत यांच्यात काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावरही खिल्ली उडवली. ते म्हणाले की, काँग्रेसने आधी स्वत:चे घर सुस्थितीत आणावे आणि नंतर राज्य सुरळीत करण्यासाठी पुढे जावे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App