विशेष प्रतिनिधी
जयपूर : कर्नाटकात काँग्रेसने हनुमान मंदिरे बांधण्याचे आश्वासन दिल्यानंतर पक्षाला सत्तेचा लाभ झाला. आता तोच प्रयोग काँग्रेसने राजस्थानात सुरू केला असून राहुल गांधींच्या टेम्पल रन सारखाच हिंदू अजेंडा हा प्रयोग आहे.Rajasthan Congress Election Hindu Agenda; Yellow flags hoisted on temples on Gurupushya Yoga; Crores spent on temple development!!
राजस्थानात काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांसाठी काही योजना आखल्या. आजच्या गुरुपुष्य योगावर राजस्थानातल्या सर्व मंदिरांवर काँग्रेसने ओम अंकित पिवळे ध्वज फडकवले आहेत. जयपूरच्या कल्की मंदिरापासून त्याची सुरुवात झाली आहे. पिवळा रंग हा गुरू ग्रहाचा मानला जातो. त्यामुळे काँग्रेसने मंदिरांवर भडकवण्यासाठी च्या ध्वजाचा रंग पिवळा निवडला आहे, अशी माहिती राजस्थानच्या देवस्थान ट्रस्ट मंत्री शकुंतला रावत यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने तीर्थयात्रा योजना आखली होती. त्यामध्ये सुरुवातीला 2000 ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्याचे ठरविले होते. परंतु आता त्या योजनेत आणखी 20000 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करून एकूण 40000 ज्येष्ठ नागरिकांना राजस्थान सरकार तीर्थयात्रा घडवून आणणार आहे. या तीर्थयात्रेमध्ये अयोध्या, काशी, मथुरा, चारधाम तसेच श्रवणबेळगोळचाही समावेश केला आहे. यातून एक प्रकारे काँग्रेस भाजपच्याच धर्तीवर हिंदुत्वाच्या दिशेने निघाली आहे. पण फक्त हिंदुत्वाचे नाव घेण्यापासून काँग्रेस स्वतःचा बचाव करत आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App