मी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहे. असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी ही माहिती दिली आहे. आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समजल्यानंतर आपण स्वतःचे विलगिकरण केले असल्याचे मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले.Rajasthan Chief Minister Bhajanlal Sharma Corona positive
भजनलाल शर्मा यांनी X वर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘आज माझी आरोग्य चाचणी केल्यानंतर माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहे. आगामी सर्व कार्यक्रमात मी आभासी माध्यमातून सहभागी होणार आहे.
भजनलाल शर्मा हे मूळचे भरतपूरचे आहेत. ते सांगानेर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्यावर मतदारसंघाबाहेरचा उमेदवार असा ठपकाही ठेवण्यात आला होता. पण असे असतानाही शर्मा यांनी सांगानेरमधून काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांनी 48,081 मतांनी पराभूत केले. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे असल्याचे बोलले जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App