जयपूर सेंट्रल जेलमधून ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण बुधवारी समोर आले आहे. जयपूर सेंट्रल जेलमधून ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.Rajasthan Chief Minister Bhajan Lal Sharma threatened to kill
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्माला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन ट्रेस केले असता ते जयपूर सेंट्रल जेल असल्याचे निष्पन्न झाले. कारागृहातील एका कैद्याने नियंत्रण कक्षाला फोन करून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत.
जयपूर मध्यवर्ती कारागृहातून आलेल्या कॉलमुळे जेलर आणि डेप्युटी जेलरला निलंबित करण्यात आले आहे. कारागृहात मोबाईल फोन आणि सिमकार्ड कसे पोहोचले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी लाल कोठी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App