अपघातात मृत्यू पावलेले बीएसएफ पंजाब फ्रंटियरचे आहेत.संदीप कुमार असे अपघातात प्राण गमावलेल्या जवानाचे नाव आहे. Rajasthan: Blast at Army’s Kishangarh Field Firing Range, 1 jawan martyred; 8 injured
विशेष प्रतिनिधी
राजस्थान : राजस्थानमधील जैसलमेर येथील किशनगढ फील्ड फायरिंग रेंजमध्ये रविवारी सराव सुरू असताना मोर्टारच्या स्फोटामुळे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. तर आठ जवान गंभीर जखमी आहेत. सर्वांना रामगड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू पावलेले बीएसएफ पंजाब फ्रंटियरचे आहेत.संदीप कुमार असे अपघातात प्राण गमावलेल्या जवानाचे नाव आहे.
किशनगड फायरिंग रेंज भारत-पाक सीमेवर तनोटजवळ आहे. येथे सतत सराव सुरू असतो. रविवारीही बीएसएफचे जवान नियमित कसरत करत होते. दरम्यान, सकाळी हा अपघात झाला. जखमी जवानांना तातडीने जवळच्या रामगड रुग्णालयात नेण्यात आले व तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी संदीप कुमार यांना मृत घोषित केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App