डॉ. किरोडीलाल मीणा यांना अमागढ किल्ल्यात पूजा करायची होती, पण पोलिसांनी त्यांना तिथे जाण्यास आधीच बंदी घातली होती. त्यांनी ध्वज फडकावल्याचे निमित्त करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. Rajasthan BJP MP hoists flag over historic Amagadh fort, MP arrested
विशेष प्रतिनिधी
जयपूर : भाजप खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांना राजस्थानच्या जयपूरमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मीणा यांनी अमागढ किल्ल्यावर ध्वज फडकवल्याचा आरोप आहे.
डॉ. किरोडीलाल मीणा यांना आमगढ किल्ल्यात पूजा करायची होती, पण पोलिसांनी त्यांना तिथे जाण्यास आधीच बंदी घातली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात आधी कॉंग्रेसचे आमदार रामकेश मीणा यांनी यापूर्वी कथितरीत्या अमागढ किल्ल्यावर भगवा ध्वज फाडल्याचा आरोप आहे. यानंतर हे प्रकरण पेटले होते.
यानंतर पुन्हा भाजप खासदार किरोडीलाल मीणा यांनी अमागढ किल्ल्यावर मीणा समाजाचा झेंडा फडकवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला असला तरी अपयशी ठरले. यानंतर पोलिसांना त्यांना अटक करावी लागली. खासदार मीणा यांना अटक झाल्यावर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुझे आमागढ़ फोर्ट गिरफ्तार कर लिया गया है। pic.twitter.com/gh3YiLrIYw — Dr.Kirodi Lal Meena (Modi Ka Parivar) (@DrKirodilalBJP) August 1, 2021
मुझे आमागढ़ फोर्ट गिरफ्तार कर लिया गया है। pic.twitter.com/gh3YiLrIYw
— Dr.Kirodi Lal Meena (Modi Ka Parivar) (@DrKirodilalBJP) August 1, 2021
वसुंधरा राजे यांनी या प्रकरणावर ट्वीट केले आणि लिहिले की, आमगढ किल्ल्याच्या बाबतीत धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या काँग्रेसला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या डॉ. किरोडीलाल मीणा जी यांची अटक निंदनीय आहे .डॉ मीणा यांची तत्काळ सुटका करावी.
आमागढ़ क़िले के मामले में धर्म के नाम पर राजनीति कर रही कोंग्रेस को करारा जवाब देने वाले डॉ.किरोड़ी लाल मीणा जी की गिरफ़्तारी निंदनीय है। डॉ.मीणा को तुरंत रिहा किया जाय।@DrKirodilalBJP @BJP4Rajasthan@BJP4India — Vasundhara Raje (मोदी का परिवार) (@VasundharaBJP) August 1, 2021
आमागढ़ क़िले के मामले में धर्म के नाम पर राजनीति कर रही कोंग्रेस को करारा जवाब देने वाले डॉ.किरोड़ी लाल मीणा जी की गिरफ़्तारी निंदनीय है। डॉ.मीणा को तुरंत रिहा किया जाय।@DrKirodilalBJP @BJP4Rajasthan@BJP4India
— Vasundhara Raje (मोदी का परिवार) (@VasundharaBJP) August 1, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App