विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीअगोदरच काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रविवारी माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय आणि माजी कॅबिनेट मंत्री लालचंद कटारिया यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.Rajasthan Big blow to Congress 32 leaders join BJP including former minister Rajendra Yadav
एवढेच नाही तर त्यांच्याशिवाय अन्य ३२ नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. जयपूर येथील भाजपा प्रदेश कार्यालयात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजपा प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.
लालचंद कटारिया यांच्याशिवाय रविवारी काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या नेत्यांमध्ये गेहलोत सरकारमध्ये मंत्री असलेले राजेंद्र यादव, माजी आमदार रिचपाल मिर्धा, खिलीलाल बैरवा, आलोक बेनिवाल, विजयपाल मिर्धा, भिलवाडा माजी जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे. लालचंद कटारिया हे गेहलोत यांच्या जवळचे होते. तर खिलाडी लाल बैरवा हे सचिन पायलटचे कट्टर समर्थक आहेत. रामपाल शर्मा हे माजी विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या जवळचे मानले जातात.
काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झालेले लालचंद कटारिया म्हणाले की, मी सदसद्विवेकबुद्धीचे ऐकले आणि भाजपामध्ये प्रवेश केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. आगामी निवडणुकीत भाजपाला पुढे नेणार. कटारिया म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारताला जगात ओळख मिळवून दिली आहे. आज भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये दोन माजी मंत्री आणि चार माजी आमदारांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App