विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:प्रवाशांची कमतरता आणि देशात कोरोनाचे संकट लक्षात घेता पुढील आदेशांपर्यंत रेल्वेने २८ लांब-अंतराच्या गाड्या रद्द केल्या आहेत. यात शताब्दी, राजधानी, दुरंतो आणि वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. उत्तर रेल्वेने आज एका निवेदनात ही माहिती दिली. Railways suspends Shatabdi, Rajdhani, Duranto Express among 29 trains from May 9
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये नवी दिल्ली-हबीबगंज शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-कालका शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-अमृतसर शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-देहरादून शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-काठगोदाम शताब्दी स्पेशल आणि नवी दिल्ली-चंडीगड शताब्दी स्पेशलचा समावेश आहे. पुढील आदेश होईपर्यंत ९ मेपासून ते रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नवी दिल्ली-देहरादून जनशताब्दी स्पेशल १० मे आणि नवी दिल्ली-उना जनशताब्दी स्पेशल ९ मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द केल्या आहेत .
Indian #Railway cancels 28 pairs of long distance trains due to low occupancy and surge in COVID cases. pic.twitter.com/NCX6PhJCf4 — All India Radio News (@airnewsalerts) May 6, 2021
Indian #Railway cancels 28 pairs of long distance trains due to low occupancy and surge in COVID cases. pic.twitter.com/NCX6PhJCf4
— All India Radio News (@airnewsalerts) May 6, 2021
दुरंतो आणि वंदे भारत एक्स्प्रेस देखील रद्द
रेल्वेने निझामुद्दीन-पुणे दुरंतो स्पेशल १० मे पासून आणि सराई रोहिल्ला-जम्मू दुरंतो स्पेशल ९ मेपासून पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. निजामुद्दीन-चेन्नई राजधानी स्पेशल १२ मे आणि नवी दिल्ली-बिलासपूर राजधानी स्पेशल ११ मेपासून रद्द करण्यात येणार आहेत. दिल्ली-कटरा वंदे भारत स्पेशल एक्सप्रेस ९ मे पासून रद्द करण्यात आली आहे. कोरोना काळातील नियमित गाड्या ऑपरेशनसाठी बंद आहेत, परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विशेष गाड्या चालवित आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App