
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ऑक्सिजन वाहतूक जलद होण्यासाठी रेल्वेने सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सरकारांनी केली होती. ती केंद्र सरकारने मान्य केली असून रेल्वेद्वारे Liquid Medical Oxygen (LMO) आणि ऑक्सिजन सिलिंडर्सची वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.Railways is getting fully ready to transport Liquid Medical Oxygen (LMO) & oxygen cylinders across key corridors
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह करताना एक नकाशा दाखवून पूर्वेकडच्या राज्यांमधून ऑक्सिजन वाहतूक रस्त्याने होणे कसे अवघड आणि वेळखाऊ आहे, हे दाखविले होते. त्याचवेळी त्यांनी रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतूकीची सुविधा केंद्र सरकारने पुरवावी
अशी मागणीही केली होती. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील केंद्र सरकारला तसे पत्र लिहिले होते. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत ऑक्सिजन टॅंकर्सच्या रेल्वे वाहतूकीची परवानगी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर यांची प्रचंड गरज निर्माण होते आहे. ती भागविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहे. देशभरात १६२ ऑक्सिजन उत्पादन प्लँट्स उभारण्यासाठी केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.
Railways is getting fully ready to transport Liquid Medical Oxygen (LMO) & oxygen cylinders across key corridors. Madhya Pradesh & Maharashtra governments had approached Railway Ministry to explore whether LMO tankers could be moved by rails: Indian Railways pic.twitter.com/u4BbdhjwTO
— ANI (@ANI) April 18, 2021
हे सर्व प्लँट्स सरकारी हॉस्पिटलच्या परिसरात असतील. यातून 154.19 MT मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादन होईल.ऑक्सिजन उत्पादन प्लँट्स मंजूर झालेली यादी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. यातले ३३ प्लँट्स आधीच इन्स्टॉल करण्यात आले असून बाकीचे लवकरात लवकर इन्स्टॉल करण्यात येतील, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.