पंतप्रधान मोदींनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
विशेष प्रतिनिधी
आइजोल : मिझोराममधील सैरांग भागात बुधवार, 23 ऑगस्ट रोजी निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. प्रशासकीय अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिझोरामची राजधानी आइजोल पासून २१ किमी अंतरावर सायरंग परिसरात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. Railway bridge under construction collapses in Mizoram 17 laborers killed Rescue continues
पोलिसांचे म्हणणे आहे की घटनेच्या वेळी सुमारे ३५ ते ४० मजूर पुलावर काम करत होते. बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथंगा यांनी या अपघाताशी संबंधित छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच, प्रशासनाकडून सातत्याने बचावकार्य सुरू असल्याचे सांगून त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
या पुलाला एकूण चार खांब आहेत. मुख्यमंत्र्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या खांबामधील गर्डर कोसळल्याचे दिसून येते. या गर्डरवर सर्व मजूर काम करत असताना हा अपघात झाला. जमिनीपासून पुलाची उंची १०४ मीटर किंवा ३४१ फूट असल्याचे सांगितले जाते.
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. मिझोराममधील पूल दुर्घटनेमुळे दु:ख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत अशी माझी मनोकामना आहे. मदत आणि बचाव कार्य सातत्याने सुरू आहे. त्याद्वारे बाधितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना ५०हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App