विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ED ने छापा टाकताच पळून जाण्यासाठी आमदाराची कुंपणावरून उडी; याला म्हणतात शूर ममतांच्या पक्षाची लढाईची तयारी!!, असे म्हणायची वेळ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या कृत्याने आणली. Jeevan Krishna Sah
त्याचे झाले असे :
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाचा चौकशी आणि तपास करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ED) तृणमूल काँग्रेसचे मुर्शिदाबादचे आमदार जीवन कृष्ण साह यांच्या घरी छापे घातले. त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. पण ईडीचे अधिकारी छापा घालायला आल्याचे समजताच आमदार जीवन कृष्ण साह अंगावरच्या कपड्यांनिशी घरातून बाहेर पळाले. त्यांनी कुंपणावरून उडी टाकली आणि ते पळून गेले. त्यांनी त्यावेळी आपल्याबरोबर मोबाईल फोन देखील घेतले होते. पळून जातानाच त्यांनी ते मोबाईल फोन एका नाल्यामध्ये फेकून दिले.
ईडीच्या टीमने आमदारांच्या घरावरील छापे चालू ठेवले आणि दुसरी तुकडी आमदारांना पकडायला त्यांच्या मागे धावली. पण ईडीच्या तुकडी पुढे आमदार फार वेळ पळू शकले नाहीत. ईडीच्या तुकडीने त्यांना लगेच ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया करून अटक केली. त्यांनी नाल्यात फेकलेले फोन देखील लगेच ताब्यात घेतले.
जीवन कृष्णा साह हे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार आहेत. ज्या ममता बॅनर्जी मोदी सरकार विरुद्ध लढण्यासाठी आकाश पातळ एक करू. मोदी सरकार विरुद्ध लढाई करू. मोदी सरकारला पराभूत करू, असे म्हणतात. पण त्या ममतांच्या आमदाराने फक्त ईडीचा छापा पडताच कुंपणावरून उडी टाकून धूम ठोकली. यातूनच ममतांच्या पक्षाची मोदी सरकार विरुद्ध लढाईची “खरी तयारी” दिसली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App