वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील द्वारका येथील घरातून शनिवारी रात्री ईडीचे बनावट अधिकारी बनून भामट्यांनी 3 कोटी रुपयांची लूट केली. पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.Raid in Delhi posing as a fake ED officer; Absconded with 3 crores in just 30 minutes
हे सर्वजण पोलीस बंदोबस्त तोडून कारमध्ये बसून पळत होते. पोलिसांनी त्यांचा दोन किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडले आणि लुटलेल्या रकमेतील एक कोटी रुपये जप्त केले.
ही बाब द्वारकाच्या बाबा हरिदास नगरची आहे. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, शनिवारी मध्यरात्री काही लोक जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. हे सर्वजण स्वत:ला अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी असल्याचे सांगत होते.
अवघ्या 30 मिनिटांत चोरट्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि 3 कोटी रुपये घेऊन निघून गेले. निघताना त्यांनी कुटुंबीयांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्यास सांगितले.
पीडित व्यक्तीने जमीन विकून गोळा केले होते पैसे
नुकतीच जमीन विकून पैसे मिळवल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. छापेमारीत त्यांना थोडे संशयास्पद वाटले. ज्या दोन गाड्यांमधून हे आरोपी आले होते, त्यावर कोणताही अधिकृत फलक नव्हता. त्यांच्याकडे पिस्तूल होते आणि त्यांचे वागणेही विचित्र वाटत होते.
आरोपी तेथून निघून गेल्यानंतर कुटुंबातील एका सदस्याने सकाळी 1.15 च्या सुमारास पोलिसांना फोन केला. पीसीआर पोलिस घरी पोहोचले तेव्हा पीडित व्यक्तीने त्यांना सांगितले की बनावट ईडी टीम मित्रौन गावाकडे गेली आहे. द्वारका येथे तैनात केलेल्या पथकांना सतर्क करण्यात आले आणि त्यांनी विविध भागांत तपास सुरू केला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी 2 किमी पाठलाग करून पकडले
काही वेळाने पोलिस नियंत्रण कक्षाच्या पथकाला एक कार वेगाने जात असल्याचे दिसले. त्याने ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा केला, पण तो थांबला नाही. यानंतर पोलिसांनी गाडीचा 2 किमी पाठलाग करून नरेला येथे गाडी थांबवण्यात यश मिळविले. गाडी थांबताच एका बदमाशाने पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडले.
पोलिसांना कारमध्ये 70 लाख रुपये सापडले. अमित ऊर्फ विकी (३७, रा. सोनीपत) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी बिंदापूर येथील खुनासह दोन गुन्हे दाखल होते. पोलीस अधिकारी आनंद मिश्रा म्हणाले, अमितला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. डीसीपी (द्वारका) एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, अटकेनंतर छापे टाकण्यात आले आणि आणखी तीन संशयितांना अटक करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App