विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे “कॉन्शियस कीपर” ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी एकीकडे भाजपमध्ये सामील होत असताना दुसरीकडे काँग्रेसचे राहुल प्रियांका आणि सिद्धू हे दमदार त्रिकूट पुन्हा एक झाले आणि पक्ष संघटनेच्या कामाला लागले.Rahul – Priyanka – Sidhu : Congress’ “Powerful Trio” reunites; The work of party organization started!!
काल दुपारी अनिल अँटनी यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले, तर काल सायंकाळी नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपले मेंटॉर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. स्वतः ट्विट करून सिद्धू यांनी ही माहिती जगजाहीर केली. मोदी सरकारला उद्देशून त्यांनी ट्विट केले. तुम्ही मला तुरुंगात घालू शकाल. माझी बँक खाते सील करू शकाल. पण माझी आणि माझ्या नेत्याची काँग्रेस पक्ष आणि पंजाब प्रति असलेली कमिटमेंट थांबवू शकत नाही, असा इशारा त्यांनी मोदी सरकारला या ट्विट मधून दिला.
पंजाब मध्ये गुरुदीप सिंग या वृद्धगृहस्थाला भर रस्त्यात मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल सिद्धूला सुप्रीम कोर्टाने शिक्षा फर्मावली होती. ती शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर सिद्धू पुन्हा राजकीय दृष्ट्या सक्रिय झाले आहेत आणि सक्रिय होताना त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली आहे.
Met my Mentor Rahul ji and Friend, Philosopher, Guide Priyanka ji in New Delhi Today. You can Jail me , Intimidate me, Block all my financial accounts but My commitment for Punjab and My Leaders will neither flinch nor back an inch !! pic.twitter.com/9EiRwE5AnP — Navjot Singh Sidhu (@sherryontopp) April 6, 2023
Met my Mentor Rahul ji and Friend, Philosopher, Guide Priyanka ji in New Delhi Today.
You can Jail me , Intimidate me, Block all my financial accounts but My commitment for Punjab and My Leaders will neither flinch nor back an inch !! pic.twitter.com/9EiRwE5AnP
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) April 6, 2023
तुरुंगात जाण्यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू पंजाब प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला. आम आदमी पार्टीने काँग्रेसला धूळ चारली त्यावेळी सिद्धू यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. तीच काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली, असा आरोप माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला होता. काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून सिद्धू यांच्या सल्ल्याने चरणजीत सिंग चन्नी या दलित नेत्याला यांना मुख्यमंत्री केले होते. पण काँग्रेसची ही चाल देखील पंजाब मध्ये पक्षाला वाचवू शकली नव्हती. चरणजीत सिंग चन्नी हे कायम नवज्योत सिंग सिद्धू यांच्या छायेखाली राहिले. काही वेळा त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्यावर सिद्धूंनी हाणून पाडले होते.
आता तुरुंगातून सुटल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू हे नव्या राजकीय जॉबच्या शोधात आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन आपली पक्षावरची आणि गांधी परिवाराची निष्ठा दाखवून दिली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना भेट दिली असली तरी ते त्यांना काँग्रेसमध्ये कोणता नवा राजकीय जॉब देतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App