विशेष प्रतिनिधी
लखनऊ : राहूल हे तर फेक गांधी आहेत. महात्मा गांधींचे स्वप्न भारतीय जनता पक्ष पूर्ण करतोय असा हल्लाबोल केंद्रीय पंचायतराज मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर केला आहे.उत्तर प्रदेशात एका प्रचारसभेत बोलाताना सिंह म्हणाले, हिंदुत्व भारताचा आत्मा आहे,Rahul is fake Gandhi, BJP is fulfilling Mahatma Gandhi’s dream, Giriraj Singh’s attack
जे समजायला राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना अनेक जन्म घ्यावे लागतील. पाकिस्तानात बसलेले लोक आणि ओवैसींसारख्या लोकांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. युपीच्या निवडणुकीत यंदा भारतीय लोक आपल्या मताची ताकद दाखवून देतील.
राहुल गांधी हे नकली गांधी आहेत. महात्मा गांधींच्या स्वप्नाला भाजप आणि योगी सरकार पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. याशिवाय सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून राज्यातील सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यावर ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन आपले विकास कामे मोजून दाखवले आहेत. जर अखिलेश यादव यांना यावर आक्षेप असेल तर त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर खटला भरावा.
दहशतवादाविरोधात संपूर्ण जागचं नेतृत्व भारत करत आहे. कोरोनाच्या व्यवस्थापनात जगानं मोदींची कार्यपद्धतीनं स्विकारली आहे. सर्वाधिक लसीकरणंही आपल्याच देशात झालं आहे. बुबआ अखिलेश यादव सुरुवातीला याला भाजपची लस संबोधत होते. त्यांनीही आपल्या वडिलांना हीच लस दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App