विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना व्यवस्थापनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत टीकास्त्र सोडत आहेत. आता राहुल यांनी आता कोरोना काळात गरीबी वाढल्याच्या अहवालाचा दाखला देत ट्विट करून पंतप्रधानांवर प्रहार केला आहे. गरीबी वाढणे भारत सरकारच्या साथरोग निर्मुलन व व्यवस्थापनशून्यतेचा परिणाम आहे. परंतु आता आपल्याला भविष्याकडे पहावे लागेल. आपल्या देशाच्या पुनर्निर्माणाची सुरवात तेव्हाच होईल, जेव्हा पंतप्रधान आपल्या चुका मान्य करतील आणि कोरोना व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांची मदत घेतील. प्रत्येक गोष्ट नाकारण्याच्या भूमिकेतून काहीही तोडगा निघणार नाही, असा टोलाही राहुल यांनी लगावला आहे. Rahul gandhi targets PM modiji
लसीकरण धोरण, गरिबांना रोख रकमेची मदत यांसारख्या मुद्द्यांवर गेले काही दिवस राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यामातून त्यांनी टीकेचा धार वाढवत न्यायचा सातत्याने प्रयत्न केला आहे. राहुल यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची एकही संधी भाजपनेही सोडलेली नाही. त्यामुळे आता राहुल यांच्या नव्या टीकेला भाजपचे प्रवक्ते कशाप्रकारे पलटवार करून उत्तर देतील हे पाहणे रंजक ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App