सगळा हिंदू समाज हिंसक असल्याची राहुल गांधींची लोकसभेत शेरेबाजी, पंतप्रधान मोदींनी उठून आवाज नोंदविला विरोधी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारवर शरसंधान साधताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी लोकसभेत संपूर्ण हिंदू समाजालाच हिंसक असल्याची शेरेबाजी करून बसले. त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उठून आपला विरोधातला आवाज लोकसभेत नोंदविला. Rahul Gandhi’s remarks in the Lok Sabha that the entire Hindu society is violent

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल गांधींचे पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेते म्हणून लोकसभेत भाषण झाले, पण त्यावेळी त्यांनी नियमभंग करत भगवान शंकर, गुरुनानक, जीजस ख्राईस्ट यांचे फोटो दाखवून सत्य आणि अहिंसेवर “प्रवचन” दिले. पण हे प्रवचन देत असताना ते सगळ्या हिंदू समाजावरच घसरले. काँग्रेस सह सगळी विरोधी खासदार सहिष्णू आहेत त्यामुळे ते सगळे हिंदू आहेत पण नरेंद्र मोदी आणि भाजपचे खासदार हे खरे हिंदू नाहीत असे टीकास्त्र सोडताना त्यांनी संपूर्ण हिंदू समाजच हिंसक असल्याची टिपण्णी केली.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सगळे खासदार संतापले. मोदी आपल्या जागेवरून उठले आणि संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक ठरवणे बेजबाबदार होण्याचे लक्षण असल्याचे त्यांनी राहुल गांधींना ठणकावून सांगितले त्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भुपेंद्र यादव आणि भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार शरसंधान साधले त्यानंतर राहुल गांधींनी आपल्या टीकेचा रोख हिंदू समाजावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या खासदारांवर वळविला. हिंदू समाज हिंसक नव्हे, तर नरेंद्र मोदी आणि संघाचे सदस्य समाजात नफरत आणि हिंसाचार फैलावतात, असा आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधींनी हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी करत भाजपच्या खासदारांनी लोकसभेत त्यांच्यावर आणि काँग्रेसवर जोरदार पलटवर केला.

Rahul Gandhi’s remarks in the Lok Sabha that the entire Hindu society is violent

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात