नाशिक : राजधानी नवी दिल्लीत काँग्रेसने आज आयोजित केलेल्या मनरेगा श्रमिक संमेलनात काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या भाषणांपेक्षा राहुल गांधींचे फोटोशूटच सोशल मीडियावर जास्त गाजले. राहुल गांधींनी या संमेलनात अंगात काळा स्वेटशर्ट, डोक्याला मुंडासे आणि हातात कुदळ घेऊन फोटोशूट केले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा त्या फोटोशूट मध्ये सामील झाले.
केंद्रातल्या मोदी सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजना रद्द करून व्ही बी रामजी योजना आणली. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसने दिल्लीतल्या जवाहर भवन मध्ये मनरेगा श्रमिक संमेलन घेतले. या संमेलनामध्ये राहुल गांधींनी अंगात काळा स्वेटशर्ट घालून, डोक्याला पांढरे मुंडासे बांधून आणि हातात कुदळ घेऊन स्टेजवरच फोटोशूट केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सुद्धा डोक्याला मुंडासे बांधून आणि हातात कुदळ घेऊन या फोटोशूट मध्ये सामील झाले. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा हा फोटो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला.
– राहुल गांधींचे टीकास्त्र
केंद्रातल्या मोदी सरकारने ज्या वाईट हेतूने तीन काळे कृषी कायदे आणले होते, त्याच वाईट हेतूने मनरेगा कायदा हटवून त्याच्या ऐवजी रामाचे नाव असलेला व्ही बी रामजी कायदा अस्तित्वात आणला. त्याच्या विरोधात देशभरातल्या सगळ्या श्रमिकांनी एकवटून उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी केले.
– मल्लिकार्जुन खर्गेंचे टीकास्त्र
देशात आणि संपूर्ण जगात महात्मा गांधींची वेगळी ओळख आहे परदेशात आपला देश महात्मा गांधींचा देश म्हणूनच ओळखला जातो पण मोदी सरकारला महात्मा गांधींचे नाव सगळीकडूनच पुसून टाकायचे आहे त्यामुळे मनरेगा कायद्यातून सुद्धा त्यांनी महात्मा गांधींचे नाव पुसून टाकले, असा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
– भाषणांपेक्षा फोटोशूटच जास्त गाजले
पण काँग्रेसने मनरेगा श्रमिक संमेलन रामलीला मैदान किंवा अन्य कुठल्याही मोकळ्या मैदानावर घेण्याच्या ऐवजी ते जवाहर भवन मध्ये घेणे पसंत केले त्यामुळे हे मनरेगा श्रमिक संमेलन होते, की काँग्रेसचे केवळ कार्यकर्त्यांचे संमेलन होते??, असा सवाल या निमित्ताने समोर आला. शिवाय संमेलनात मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणांपेक्षा त्यांनी डोक्याला मुंडासे बांधून आणि हातात कुदळ घेऊन केलेले फोटोशूट सोशल मीडियावर जास्त गाजले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App