राहुल गांधींचे “पॅकेजिंग – री पॅकेजिंग” सुरू, पण त्यांची क्षमता तरी आहे का??; अविश्वास ठरावावर बोलण्यापूर्वीच भाजपचे प्रश्नचिन्ह!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावर आज राहुल गांधी भाषण करणार आहेत. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी ही घोषणा केली. पण ही घोषणा करताच राहुल गांधी प्रत्यक्षात बोलण्यापूर्वीच भाजप नेत्यांच्या नेतृत्वगुणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राहुल गांधींचे पॅकेजिंग – री पॅकेजिंग सुरू आहे. पण त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता तरी आहे का??, याचा विचार काँग्रेस पक्षाने केलाय का??, असा सवाल भाजपचे प्रवक्ते माजी केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.Rahul Gandhi’s packaging – re-packaging continues, but does he have the potential?

काँग्रेसने मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याचा आज दुसरा दिवस आहे. काल दिवसभरातल्या चर्चेत राहुल गांधी बोलण्याची अपेक्षा होती. किंबहुना अविश्वास ठरावाच्या पहिल्याच भाषणाची त्यांच्याकडून अपेक्षा होती. पण राहुल गांधी लोकसभेत आले, तरी काल बोलले नाहीत. त्यांच्या ऐवजी काँग्रेसने आसामचे तरुण खासदार गौरव गोगई यांना अविश्वास ठराव मांडण्याची संधी दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न विचारले.



अविश्वास ठरावावर काल अनेकांची भाषणे झाली. पण काल लोकसभा गाजवली, ती आजी-माजी शिवसैनिकांनी. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात काल लोकसभेत जोरदार धुमश्चक्री झाली.

नेत्यांचीच मुलं पंतप्रधान वा मुख्यमंत्री

आज दुसऱ्या दिवशी राहुल गांधी बरोबर दुपारी बारा वाजता अविश्वास ठरावावर बोलतील, असे अधीर रंजन चौधरी यांनी जाहीर केले. या पार्श्वभूमीवर भाजपने मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वगुणांवर ठळक प्रश्नचिन्ह लावले. घराणेशाहीचा मतलब समजून देताना भाजपचे प्रवक्ते माजी केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, की घराणेशाहीचा मतलब हा नाही, की कोणा घराण्यातल्या व्यक्तीवर निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालणे. लोकशाही तत्वानुसार तशी बंदी कोणीच घालू शकत नाही. पण नेत्याचाच मुलगा अथवा मुलगी पक्षाचा नेता बनणे किंवा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनविणे याला घराणेशाही म्हणतात. नेत्याच्या मुलीची अथवा मुलाची क्षमता आहे की नाही हे सुद्धा पाहिले जात नाही, ही घराणेशाही आहे. अशा पक्षांमध्ये सर्वसामान्य नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही स्थानच उरत नाही, ही खरी घराणेशाहीची व्याख्या आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

त्याचे उदाहरण देताना रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींचे पॅकेजिंग – री पॅकेजिंग सुरू असल्याचे टीका केली. राहुल गांधींमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे की नाही हे देखील काँग्रेसजन पाहातही नाहीत. अजमावत नाहीत. त्यांचे नेतृत्व संपूर्ण देशावर लादू पाहतात, असे शरसंधानही रविशंकर प्रसाद यांनी सोडले.

राहुल गांधी आज अविश्वास ठरावावर बोलणार आहेत या पार्श्वभूमीवर नेमके राजकीय टाइमिंग साधून भाजपने अशा प्रकारे राहुल गांधींच्या नेतृत्व क्षमतेवर ठळक प्रश्नचिन्ह लावले आहे.

Rahul Gandhi’s packaging – re-packaging continues, but does he have the potential?

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात