‘’राहुल गांधींनी संसदेतून जाताना ‘फ्लाईंग किस’चे हावभाव केले’’ स्मृती इराणींचा सभागृहात गंभीर आरोप!

No Confidence Motion : ‘भारतमातेच्या हत्येवर काँग्रेसवाले टाळ्या वाजवत आहेत’ असंही स्मृती  इराणींनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेच्या लोकसभा सभागृहात अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली आहे असे म्हटले. तर यावर भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. याशिवाय  भाषण संपवून संसदेबाहेर जाताना राहुल गांधी यांनी महिला खासदारांना लक्ष्य करत फ्लाइंग किसचे हावभाव केले. असा गंभीर आरोपही स्मृती इऱाणी  यांनी केला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात खासदार शोभा करंदलाजे यांनीही सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. Rahul Gandhis gesture of ‘flying kiss’ while passing through Parliament” Smriti Irani’s serious accusation in the House

स्मृती इराणी म्हणाल्या, “माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्यांना माझ्याअगोदरर बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यांनी जाताना अभ्रद्र कृत्य दर्शवले. महिला सदस्य असलेल्या संसदेला फ्लाईंग किस देणारा केवळ एक दुष्ट पुरुष असू शकतो. देशाच्या संसदेत असे अशोभनीय आचरण यापूर्वी कधीच पाहिले नव्हते.”

शोभा करंदलाजे म्हणाल्या, “सर्व महिला सदस्यांना फ्लाईंग किस देऊन राहुल गांधी निघून गेले. एका सदस्याचे हे संपूर्ण गैरवर्तन आहे. हे सदस्याचे अयोग्य आणि असभ्य वर्तन आहे. भारताच्या संसदेच्या इतिहासात असे कधीच घडले नाही…हे काय वर्तन आहे? ते कोणत्या प्रकारचे नेता आहेत? म्हणूनच त्यांचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार आम्ही सभापतींकडे केली आहे”

याशिवाय काँग्रेसवर निशाणा साधताना स्मृती इराणी म्हणाल्या, ‘तुम्ही भारत नाही कारण भारत भ्रष्ट नाही. आज सभागृहात भारतमातेच्या हत्येची चर्चा झाली आणि काँग्रेसवाले मात्र या विषयावर टाळ्या वाजवत आहेत. याचबरोबर त्यांनी म्हटले की, मणिपूर तुकडे झालेले नाही, विभागलेले नाही. तो देशाचा भाग आहे. मणिपूरचे खंडित नव्हते, नाही आणि होणारही नाही.’’

Rahul Gandhis gesture of flying kiss while passing through Parliament Smriti Iranis serious accusation in the House

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात