Vote Chori : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या परखड प्रत्युतरानंतर देखील राहुल गांधींचा सकट सगळ्या विरोधकांचे निवडणूक आयोगावर पुन्हा तेच आरोप!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतातल्या निवडणूक प्रक्रिये संदर्भातल्या कायद्यांचे स्पष्टीकरण देऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी मतदान चोरीबद्दल परखड मत व्यक्त केले. विरोधकांचे सगळे आरोप खोडून काढले, तरी देखील राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या दोन्ही नेत्यांनी बिहार मधून निवडणूक आयोगावर मतदान चोरीचे जुनेच आरोप पुन्हा एकदा केले. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते इलनगोवन यांनी देखील त्याच आरोपांचा पुनरुच्चार केला. Rahul Gandhi

राहुल गांधींनी बिहार मधल्या 50 विधानसभा मतदारसंघांमधून जाणारी मतदार अधिकार यात्रा आजच सुरू केली. या यात्रेत सुरुवातीला त्यांच्याबरोबर तेजस्वी यादव देखील सामील झाले. या यात्रेची सुरुवात करताना केलेल्या भाषणात राहुल गांधींनी जुनीच टेप लावली. महाराष्ट्रातल्या कथित मतदान चोरीची जुनीच कथा सांगितली‌. त्या कथेला तेजस्वी यादवांनी दुजोरा दिला.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला 14 खासदार निवडून आणता आले, पण त्यानंतर चारच महिन्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. अचानक काँग्रेसचे मतदार कुठे गायब झाले?, हे आम्हाला कळले नाही म्हणून आम्ही चौकशी आणि तपास केला. तेव्हा निवडणूक आयोगाने जादूची कांडी फिरवून 1 कोटी मतदार वाढविल्याचे आम्हाला आढळून आले. हे सगळे 1 कोटी मतदार भाजपला मतदान करून मोकळे झाले म्हणून महाराष्ट्रात भाजपने निवडणुकीत मोठे यश मिळविले. हे “संशोधन” काँग्रेसने केले. या “संशोधनाचा” हवाला राहुल गांधींनी बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेत‌‌ दिला.

परंतु, निवडणूक आयुक्तांनी समजावून सांगितलेल्या मतदान प्रक्रिया कायदा 1951 आणि मतदार यादी निवडणूक निर्णय कायदा 1950 यातल्या फरकाविषयी राहुल गांधींनी एक चकार शब्दही भाषणातून काढला नाही. त्या उलट निवडणूक आयोगावर मतदान चोरीचा जुनाच आरोप करणारे भाषण त्यांनी ठोकले.

– तेजस्वी यादवांची दमबाजी

तेजस्वी यादव यांनी त्या पुढे जाऊन किसी के माई के लाल का हक नही, जो बिहारीओं व्होट काट सके, अशी दमबाजी केली, ज्याचा निवडणूक आयोगाशी काहीही संबंध नव्हता. बिहार मधली मतदार यादी पुन:निरीक्षणाची प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुरू आहे. ती 1 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. त्यात कुठलीही सवलत निवडणूक आयोगाने मागितली नाही आणि सुप्रीम कोर्टाने ती दिलेली नाही, तरी देखील तेजस्वी यादव यांनी “माई के लाल”, “बिहारीओं का व्होट कटना” असली भाषा वापरून निवडणूक आयोगावर आरोप करताना राहुल गांधींचीच री ओढली.

Rahul Gandhi’s dilemma: All the opposition parties again make the same allegations against the Election Commission

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात