विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘Rahul Gandhi ऑपरेशन सिंदूर’वरील लाेकसभेतील चर्चेत अमेरिकेचे अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांचा एकेरी उल्लेख करत त्यावरून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना उकसविण्याच प्रयत्न लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. यामागे भारत – अमेरिका संबंध बिघडविण्याचे राहुल गांधी यांचे षडयंत्र हाेते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संयम दाखवित राहुल गांधी यांचे षडयंत्रण यशस्वी हाेऊ दिले नाही.Rahul Gandhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला देशभरातून प्रशंसा मिळत असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत या कारवाईविरोधात आक्रमक भाष्य करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली. राहुल गांधींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला फक्त प्रचारात्मक उपक्रम म्हटले आणि पंतप्रधानांनी केवळ स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी सरकारवर “राजकीय इच्छाशक्तीचा अभाव” असल्याचे म्हटले. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते, त्यांच्या भाषणामागे एक योजनाबद्ध उद्दिष्ट होते ते म्हणजे भारताच्या अमेरिका धोरणात संभ्रम निर्माण करणे आणि मोदी सरकारला अस्थिर करणे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लोकसभेतून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना “खोटारडा” म्हणण्याचे आव्हान दिले. विश्लेषकांच्या मते, हे फक्त राजकीय आरोप नव्हते, तर एक प्रकारचा सापळा होता. त्यांनी मोदींना उकसवून भारत-अमेरिका संबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.Rahul Gandhi
यावेळी मोदींनी संयम राखत कोणताही उग्र प्रतिसाद दिला नाही. उलटपक्षी, मोदींनी दाखवलेले संयम आणि दूरदृष्टी हेच त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे. राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरवर टीका केली असली, तरी प्रत्यक्षात ही कारवाई अतिशय अचूक आणि वेळीच करण्यात आली होती. पाहलगाम हल्ल्याच्या अवघ्या ४८ तासांत भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले.
पंतप्रधान मोदींनी लोकसभेत स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताने युद्धविराम घोषित केला नव्हता. उलट, पाकिस्तानच भारताकडे दया मागत होता. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही ऑपरेशन सुरू असताना मोदींना फोन केला, त्यावेळी मोदींनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले:
“जर तुमचा हेतू युद्ध थांबवण्याचा असेल, तर त्याची किंमत मोजावी लागेल. गोळीला उत्तर गोळ्याने दिलं जाईल!”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App