विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : मणिपूर पासून निघालेली राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज आसाम मध्ये पोहोचली आणि त्यांनी इतरांना न्याय देण्यापेक्षा आधी आपल्या पक्षातल्या महिला नेत्याला “न्याय” द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसच्या एका महिला नेत्याने राहुल गांधींकडे केली. युवक काँग्रेसचे पदाधिकारी अंकिता दत्ता यांनी राहुल गांधींकडे न्यायाची मागणी केली आहे. Rahul Gandhi’s Bharat Jodo Nyaya Yatra in Assam
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी अंकिता दत्ता यांची छेड काढली होती. त्यांचा विनयभंग केला होता. त्या विरोधात अंकिता दत्ता यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखील त्यावेळी न्याय मागितला होता. या घटनेला 10 महिने उलटून गेले. बी. व्ही. श्रीनिवास यांच्यावर पक्षाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पण अंकिता दत्तांना मात्र पक्षातून बडतर्फ करून टाकले.
#WATCH Former Youth Congress leader Angkita Dutta, who made harassment allegations against Indian Youth Congress leader Srinivas BV, holds a protest in Assam's Sivasagar as 'Bharat jodo Nyay Yatra' enters the state "I was expelled (from the party) because I sought justice… pic.twitter.com/XEQGDRqg3Q — ANI (@ANI) January 18, 2024
#WATCH Former Youth Congress leader Angkita Dutta, who made harassment allegations against Indian Youth Congress leader Srinivas BV, holds a protest in Assam's Sivasagar as 'Bharat jodo Nyay Yatra' enters the state
"I was expelled (from the party) because I sought justice… pic.twitter.com/XEQGDRqg3Q
— ANI (@ANI) January 18, 2024
राहुल गांधी यांची भारत जोडून न्याय यात्रा आसामच्या जोरहाट मध्ये पोहोचली आणि त्याचवेळी अंकिता दत्ता यांनी आपल्या समर्थकांसह धरणे आंदोलन करून राहुल गांधींकडे “न्याय” मागितला माझी बाजू ऐकून न घेता माझ्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली. ज्याने माझा विनयभंग केला, त्या नेत्याला मोकाट सोडून दिले. राहुल गांधी आता आसाम मध्ये आले आहेत त्यांनीच मला न्याय द्यावा, अशी मागणी अंकिता दत्ता यांनी केली.
या संदर्भात राहुल गांधींनी कुठलेही वक्तव्य जारी केले नाही. परंतु काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी अंकिता दत्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल भाजपच्याच आसाम मधल्या नेत्यांना जबाबदार धरले. अंकिता दत्ता आणि बी. व्ही. श्रीनिवास हे दोघेही इमोशनल नेते आहेत. अंकिता दत्ता मला भेटायला आल्या होत्या. मी त्यांच्याशी बोललो दोघांमधला वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु मध्ये नारद मुनी घुसले आणि त्यामुळे वाद चिघळला असा दावा जयराम रमेश यांनी केला.परंतु अंकिता दत्तांना नेमका “न्याय” केव्हा मिळणार??, याविषयी मात्र चुप्पी साधली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App