नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे संसदेच्या आवारातले कालचे उद्दाम वर्तन पाहिले आणि सहज त्यांच्या काकांची आठवण झाली आणि त्याच वेळी पुतण्याचे पाऊल पडले पुढे, काकांना सारले मागे!! ही वस्तुस्थिती लक्षात आली.Rahul Gandhi’s behaviour in the shadow of his uncle Sanjay Gandhi
एरवी काका – पुतण्यांच्या राजकारणाने महाराष्ट्र गाजवला. उत्तर प्रदेश गाजवला. कधी काकांनी पुतण्यांवर मात केली, तर कधी पुतण्यांनी काकांवर मात केली. कधी पुतणे काकांचा अख्खा पक्ष घेऊन गेले. हे सगळे घडले तरी कुठल्याच पुतण्याला राहुल गांधींची सर आली नाही.
राहुल गांधींनी संसदेच्या आवारातल्या कालच्या उद्दाम वर्तनाने आपले काका संजय गांधी यांना देखील मागे सारले. कारण संजय गांधींनी इंदिरा गांधींच्या राजवटीत कितीही धुडगूस घातला होता, तरी तो संसदेच्या बाहेर राजधानीतल्या तुर्कमान गेट परिसरात होता. किंवा अन्यत्र देशांमध्ये होता. संजय गांधींच्या दोन मैत्रिणी रुकसाना सुलताना आणि अंबिका सोनी त्यात आघाडीवर होत्या. पण राहुल गांधींनी संजय काकांच्या पुढे पाऊल टाकत थेट संसदेच्या आवारातच धुडगूस घातला. इतकेच नाही, तर धक्काबुक्की करून दोन खासदारांना जखमी केले.
राहुल गांधींच्या वर्तनाच्या बाबतीत त्यांच्यावर त्यांच्या वडिलांची छत्रछाया पडलेली नसून त्यांच्या काकांची छत्रछाया पडलेले दिसली.
इंदिरा गांधींच्या राजवटीत संजय गांधींनी असाच धुडगूस घातला होता. विशेषतः आणीबाणीच्या काळात त्यांनी संपूर्ण देशावर सत्तेचा अनिर्बंध चाबूक चालवला होता. त्यामध्ये सक्तीची नसबंदी हा त्यातला एक छोटा भाग होता, पण देशात ठिकठिकाणी आपल्या विरोधकांना “नीट” करणे, प्रसंगी जायबंदी करणे असले प्रकार आणीबाणीच्या काळात प्रचंड वाढले होते. संजय गांधींची युवक काँग्रेस म्हणजे गुंडांची टोळी असल्याची संभावना त्यावेळच्या जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी केली होती. अगदी यशवंतराव चव्हाण यांनी देखील युवक काँग्रेस बरखास्तीची मागणी केली होती.
संजय गांधींची यंग ब्रिगेड संसदेत पोचल्यानंतर विरोधकांचा आवाज बंद करायची. कुठलाही विरोधी पक्षाचा खासदार इंदिरा सरकारच्या विरोधात भाषण करू लागला की संजय गांधींची यंग ब्रिगेड लोकसभेत धुडगूस घालायची. त्यामुळे लोकसभेचे कामकाज बंद पडायचे. खासदारांचा आवाज वैध मार्गाने बंद करता येत नाही किंवा त्यांच्यापेक्षा चांगला युक्तिवाद करून बंद करता येत नाही म्हणून इंदिरा गांधींनी संजय गांधींच्या यंग ब्रिगेड मार्फत विरोधकांचा आवाज बंद करण्याची क्लुप्ती काढली होती.
पण असे असून देखील त्यावेळी संजय गांधींनी संसदेच्या आवारात कुठल्या खासदारांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याचे उदाहरण दिसले नव्हते. किंवा धक्काबुक्की झाल्यानंतर सुद्धा जखमी खासदारांसमोर जाऊन उद्दाम वर्तन केल्याचे आढळले नव्हते. राहुल गांधींनी मात्र संजय गांधींची “ती मर्यादा” काल ओलांडून दाखवली.
राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांच्या धक्काबुक्कीत भाजपचे वरिष्ठ खासदार प्रताप चंद्र सरंगी जखमी झाले. त्यांचे डोके फुटले. ते बघायला राहुल गांधी त्यांच्याजवळ पोहोचले. त्यावेळी खासदार निशिकांत दुबे यांनी तुम्ही गुंडागर्दी करताय, असे राहुल गांधींना सुनावल्यावर यह तो कुछ भी नही. कुछ नही हुआ है!!, असे सांगून राहुल गांधी तिथून निघून गेले. धक्काबुक्कीचे त्यांनी पत्रकार परिषदेत समर्थन केले. हे राहुल पुतण्याने काका संजय गांधींच्या पुढे टाकलेले हे पाऊल ठरले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App