काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेची जागा निश्चित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत राहुल गांधींचे नाव समाविष्ट होणार आहे. राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत.Rahul Gandhi will contest from Wayanad Approved by CEC meeting of Congress
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी (7 मार्च) बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. सीईसीच्या बैठकीत विविध स्कीनिंग समित्यांनी पाठवलेल्या नावांपैकी उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत छत्तीसगडच्या राजनांदगावमधून भूपेश बघेल आणि कोरबा मतदारसंघातून ज्योत्स्ना महंत यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत दिल्लीतील तीन जागांवर नाव निश्चित होऊ शकले नाही. समितीची पुढील बैठक 11 तारखेला होऊ शकते. काँग्रेसच्या पहिल्या यादीत छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, लक्षद्वीप, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम आणि मणिपूरच्या जागांवर नावं निश्चित होण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App