विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : होतील राहुल पंतप्रधान, त्या दिवशी चप्पल घालणार!!, अशी घनघोर भीष्म प्रतिज्ञा काँग्रेसच्या एका तरुण कार्यकर्त्याने केली आहे. राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान बनविण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी दिनेश शर्माने दाखवली आहे. Rahul will become Prime Minister, will wear slippers on that day
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृह राज्य गुजरात मध्ये काँग्रेसचे अधिवेशन पार पडल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळे व्हिडिओ टाकले. त्यामध्ये एक व्हिडिओ दिनेश शर्मा या तरुण कार्यकर्त्याचा शेअर केला आहे. या तरुण कार्यकर्त्याने राहुल गांधींना पंतप्रधान बनविण्याची शपथ घेतली आहे. हा कार्यकर्ता राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाला होता. वायनाड लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्याचा वाढदिवस असताना राहुल गांधींनी तिथल्या गेस्ट हाऊस मध्ये बोलवून दिनेश शर्मा याचा वाढदिवस साजरा केला होता. ते सरप्राईज दिनेश शर्मा कधीच विसरला नाही.
त्यानंतरच दिनेश शर्माने राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी प्रतिज्ञा केली. राहुल गांधी हे देशाचे दुःख आणि दर्द समजतात. संपूर्ण देशात त्यांच्यासारखा एकही नेता नाही. राहुल गांधी जोपर्यंत देशाचे पंतप्रधान बनणार नाहीत, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. ते ज्या दिवशी पंतप्रधान बनतील, त्या दिवशीच पायात चप्पल घालेन. तोपर्यंत अनवाणी फिरेन, अशी प्रतिज्ञा दिनेश शर्माने केली. त्याचा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App