विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :‘व्होट चोरी’चा गाजावाजा करून निवडणूक आयोगावर बोट ठेवणारे राहुल गांधी आता स्वतःच वादात अडकले आहेत. काँग्रेसने देशाला दाखवलेले पुरावे प्रत्यक्षात भारतात नव्हे तर म्यानमारमध्ये तयार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
१० सप्टेंबर रोजी ‘खुर्पेन्च’ या लोकप्रिय एक्स हँडलने उघड केले की राहुल गांधींच्या ७ ऑगस्टच्या पत्रकार परिषदेत मांडलेल्या ‘Vote Chori Proof’ कागदपत्राचा ठसा थेट म्यानमार टाइमझोनमध्ये आहे. मेटाडेटा चाचणीत हे स्पष्ट झाले असून काँग्रेसच्या ‘देशी पुराव्यां’चे मुखवटे गळाले आहेत.
गूगल ड्राईव्हमधील तीन फायली (इंग्रजी, हिंदी, कन्नड) तपासल्यावर सगळ्याच UTC+6:30 म्हणजेच म्यानमार स्टँडर्ड टाइममध्ये तयार झाल्या असल्याचे उघड झाले. भारतात तयार झालेल्या कोणत्याही पीडीएफमध्ये UTC+5:30 दिसायला हवे, मात्र इथे तसं नाही.
एक्स हँडलने स्पष्ट केले की VPN वापरून किंवा गूगल ड्राईव्हवर अपलोड करून हा टाइमझोन बदलत नाही. म्हणजेच, दस्तऐवज परदेशातूनच बनवले गेले, असा संशय पक्का झाला आहे.
काँग्रेसवर हा धक्का बसताच त्यांचा आयटी सेल अस्वस्थ झाला आहे. सोशल मीडियावर काँग्रेसचे ट्रोल्स या उघडकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण म्यानमार कनेक्शनमुळे राहुल गांधींवर ‘परदेशी हात’ असल्याचा ठपका बसला असून काँग्रेसची ‘व्होट चोरी’ मोहीम स्वतःच संशयास्पद ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App