विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवरून घमसान माजले असताना लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज धारावीला भेट दिली. तिथल्या छोट्या उद्योगांना भेटी देऊन कामगार आणि उद्योजकांशी चर्चा केली. आपल्या धारावी भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. Rahul Gandhi
या धारावी भेटीमध्ये राहुल गांधींनी सुधीर चमार यांच्या स्टुडिओला भेट दिली तिथे त्यांनी कामगारांबरोबर पर्स आणि बेल्ट शिवले. तिथल्या कामगारांच्या कौशल्यावर ते खुश झाले. धारावीत आपल्याला खरे “मेक इन इंडिया” दिसले. इथल्या कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे, असे राहुल गांधींनी सोशल मीडियावर लिहिले. चामर स्टुडिओमध्ये बनलेल्या एका पर्सवर प्रियंका गांधी असे लिहिले होते तर एका वॉलेट वर राहुल गांधींचे नाव होते. हे दोन्ही राहुल गांधींना तिथल्या कारागिरांनी भेट दिले.
यावेळी राहुल गांधींनी सुलतानपूर मधले त्यांचे मित्र रामशेठ मोची यांना बरोबर आणले होते. सुधीर चामर यांच्याशी त्यांची भेट घालून दिली. चमडा उद्योगात फॅशन कशा पद्धतीने आणून त्या उद्योगाचे मूल्य वाढवता येईल, याची चर्चा राहुल गांधींनी तिथे केली. सुधीर चामर यांचा स्टुडिओ देशासाठी रोल मॉडेल आहे. त्याचा देशभर विस्तार झाला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
पण राहुल गांधींच्या आजच्या धारावी भेटीचे पडसाद मात्र मराठी माध्यमांमध्ये फारसे उमटले नाहीत. भैय्याजी जोशी यांचे मराठी विषयीचे वक्तव्य संतोष देशमुख, धनंजय मुंडे प्रकरण, खोक्या भाई उर्फ सतीश भोसले, सुरेश धस प्रकरण यामध्येच मराठी माध्यमे दिवसभर अडकली. त्यामुळे राहुल गांधींच्या धारावी भेटीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App