विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rahul Gandhi काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२० पासून आजपर्यंत तब्बल ११३ वेळा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सीआरपीएफने धक्कादायकपणे उघड केले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून राहुल गांधींना ‘यलो बुक’ प्रोटोकॉल पाळण्याची सक्त ताकीद दिली आहे.Rahul Gandhi
गांधींना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आलेली असून त्यांच्या सोबत १० ते १२ कमांडोंचा ताफा सतत असतो. प्रत्येक दौर्यापूर्वी सीआरपीएफ पथक सुरक्षा तपासणी करते. मात्र, गांधींनी वारंवार अनियोजित हालचाली, पूर्वसूचना न देता केलेले प्रवास करून नियमांकडे दुर्लक्ष केले आहे.Rahul Gandhi
सीआरपीएफच्या अहवालानुसार, गांधींनी फक्त देशांतर्गतच नव्हे तर इटली, व्हिएतनाम, यूएई, कतार, यूके आणि मलेशिया या परदेश दौर्यांमध्येही नियम मोडले. या हालचालींमुळे त्यांच्यावर ‘उच्च धोका’ निर्माण होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
गांधींनी ‘भारत जोडो यात्रा’च्या दिल्ली टप्प्यातही नियमांचे उल्लंघन केले होते. ‘यलो बुक’नुसार वीआयपींनी नेहमी आपल्या हालचालींची माहिती सुरक्षादलाला द्यावी लागते, पण गांधींनी हे सूचनांकडे वारंवार दुर्लक्ष केले.
पत्रात सीआरपीएफने स्पष्ट केले आहे की, आता पुढील काळात गांधींनी प्रोटोकॉलचे पालन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App