राहुल गांधींची फाडाफाडी; काँग्रेसला डब्यात घालणारीच!!, असे म्हणायची वेळ त्यांनी केलेल्या आजच्या फाडाफाडीमुळे आली. Rahul Gandhi
राहुल गांधींनी संसद भवनाच्या आवारात आज निवडणूक आयोगाच्या बिहार मधल्या मतदार पडताळणीच्या निर्णयाची अर्थात SIR ची कॉपी फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकली. त्यांच्या पाठोपाठ प्रियांका गांधींनी देखील SIR कॉपी फाडून त्याच डब्यात टाकली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सह सगळ्या विरोधकांनी बिहार मधल्या मतदार नसलेल्या 51 लाख प लोकांसाठी मोठे आंदोलन केले. या आंदोलनाला माध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. विशेषत: राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या फाडाफाडीला तर जास्तच प्रसिद्धी दिली.
– राहुल गांधींची जुनी फाडाफाडी
त्यामुळे राहुल गांधींनी केली जुनी फाडाफाडी सहज आठवली. 2013 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निकाला विरोधात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने एक अध्यादेश आणला होता. कुठलाही लोकप्रतिनिधी दोषी ठरला, तर त्याचे लोकप्रतिनिधित्व म्हणजेच आमदारकी आणि खासदारकी रद्द करायचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. तो निरस्त करण्यासाठी म्हणजेच निष्प्रभावी करण्यासाठी मनमोहन सिंग सरकारने अध्यादेश आणून शिक्षा झालेल्या भ्रष्ट लोकप्रतिनिधींना वाचाविले होते. त्यावेळी डाव्या पक्षांनी आणि भाजप यांनी त्या अध्यादेशाला विरोध केला होता, पण मनमोहन सिंग सरकार या विरोधकांपुढे झुकले नव्हते. त्यांना राहुल गांधींपुढे झुकावे लागले होते.
पण याच दरम्यान त्या अध्यादेशावर राहुल गांधी भडकले होते. त्यावेळी ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. यह बकवास बात हैं. इसे फाड़ देना चाहिए, असे म्हणून राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडून फेकला होता. त्यामुळे मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची उबळ आली होती. राहुल गांधींनी सरकारचा अपमान केला. सबब आपण पंतप्रधान पदावर राहता कामा नये असे त्यांना वाटले होते. तसे त्यांनी मोंटेकसिंग अहलुवालिया यांच्याकडे बोलून दाखविले होते, पण त्यांनी मनमोहन सिंग यांना रोखले होते.
Sharad Pawar शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धीचातुर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक
– काँग्रेसचा सुपडा साप
पण राहुल गांधींनी आपल्याच सरकारचा अध्यादेश फाडला. याचा दुष्परिणाम काँग्रेसवर झाला होता. काँग्रेसची आणि सरकारची प्रतिमा राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्ष असताना damage डॅमेज केली होती. जिचा damage control नंतर काँग्रेसला कधी करता आला नाही. राहुल गांधींनी अध्यादेश फाडल्यानंतर साधारण वर्ष दीड वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. 209 खासदारांची काँग्रेस 44 खासदारांवर आली होती.
खरंतर राहुल गांधी आणि काँग्रेसने या अनुभवातून शिकायला हवे होते. शहाणे व्हायला हवे होते. पण ते शहाणे झाले नाहीत म्हणूनच बिहारमध्ये निवडणूक आयोगाने काढून टाकलेल्या 51 लाख अपात्र मतदारांसाठी त्यांनी स्वतःची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. त्यांच्यासाठी आंदोलन करताना निवडणूक आयोगाच्या SIR निर्णयाची कॉपी फाडून कचरा कुंडीत टाकली. मनमोहन सिंग यांच्या सरकारचा अध्यादेश फाडून राहुल गांधींनी सरकारचे आणि काँग्रेसचे प्रतिमा भंजन केले होते. त्याचा दुष्परिणाम काँग्रेसला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भोगावा लागला होता. मग आता बिहार मधल्या मतदार नसलेल्या 51 लाख लोकांसाठी SIR ची कॉपी फाडून राहुल गांधी आणि काँग्रेस बिहारमध्ये कोणता तीर मारणार आहेत??, हा सवाल समोर आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App