विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकात मतदान चोरीची सोडून पुडी; राहुल गांधींची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकी!!, असला प्रकार आज संसदेबाहेर घडला.
कर्नाटकात मतदानाची चोरी झाली. त्यामध्ये निवडणूक आयोगाने भाजपला साथ दिली, याचे पुरावे काँग्रेसच्या हाती लागलेत, असे सांगत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाच धमकी दिली.
राहुल गांधी म्हणाले :
मतदानात चोरी होत असल्याचा आम्हाला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या वेळी संशय आला होता. महाराष्ट्रात तो संशय जास्त गडद झाला. मतदानाची चोरी करण्यासाठी निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली. महाराष्ट्रात तर 1 कोटी मतदार वाढवून ठेवले. आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रार केली पण आमच्या तक्रारीची दखल त्यांनी घेतली नाही.
त्यामुळे काँग्रेसने स्वतंत्र चौकशी आणि तपास यंत्रणा नेमून मतदानाच्या चोरीचा तपास केला. त्यावेळी कर्नाटकामध्ये मतदानात चोरी झाल्याचे आढळून आले. आमच्या हातामध्ये मोठे पुरावे लागले. हे पुरावे असे आहेत की जे निवडणूक आयोग किंवा अन्य कुठलीही यंत्रणा खोडूनच काढू शकत नाही.
मतदान चोरीचे पुरावे हा ॲटम बॉम्ब आहे. तो फुटेलच. त्यावेळी आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही. ते रिटायर झाले. इतर कुठेही निघून गेले, तरी त्यांना आम्ही शोधून काढू. त्यांना शिक्षा करू. कुणालाही आम्ही सोडणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App