Rahul Gandhi : माफीच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींना ठोकताना राहुल गांधींनी दिला RSS चा दाखला; पण सावरकरांचा विषय टाळला!!

विशेष प्रतिनिधी

सांगली : सिंधुदुर्गच्या राजकोट मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. मोदींच्या या माफीनाम्यावरून लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर ठोकले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हवाला दिला, पण सावरकरांचे नाव घेणे टाळले. सावरकरांचा अपमान करण्याच्या मुद्द्यावर राहुल गांधींवर कोर्टात खटला सुरू आहे. त्यामुळे त्यावर भाष्य केले, तर आपण अडचणीत येऊ याची भीती वाटल्यानेच राहुल गांधींनी सावरकरांचे नाव घेतले नाही, अशी चर्चा नंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली. Rahul Gandhi targets Modi over apology issue, but didn’t take savarkar’s name!!


Eknath Shinde : एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून ‎शेतकऱ्यांना भरपाई देणार, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा


देशाचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुतळा कोसळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर केवळ आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यानंतर शिवप्रेमी आणि विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कार्यक्रमातून माफी मागितली. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला पण त्यांनी माफी मागितली नाही याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संस्कार या शब्दाचा वापर करत केला पण राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन आज मोदींच्या माफीनाम्यावर हल्ला चढवताना सावरकरांचे नाव घेतले नाही. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळण्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र डागले.

राहुल गांधी म्हणाले :

पतंगराव कदम यांनी गेल्या 60 वर्षात त्यांनी तुमची माफी मागितली नाही. कारण गरज पडली नाही. कारण त्यांनी काही चूकच केली नाही, पण राज्यात काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली गेली. ती कोसळली पंतप्रधानांनी माफी मागितली. पंतप्रधानांनी कोणत्या कारणाने माफी मागितली?? त्याची वेगवेगळी कारणे असतील, पहिलं कारण ही मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिले होते. पंतप्रधान मोदींना हे सांगायचं असेल मला हे कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला द्यायचं नव्हतं. मेरीटमध्ये द्यायचं होतं. दुसरं कारण मूर्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता. मी ज्याला कंत्राट दिलं त्याने भ्रष्टाचार केला हे कारण असेल. म्हणून माफी मागितली!!

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण म्हणून मूर्ती बनवली. पण ती उभी राहू शकेल एवढंही लक्ष दिलं नाही. पतंगराम कदम यांचा पुतळा बनवला. तुम्ही ५० वर्षानंतर या हा पुतळा असाच असेल. सर्वात मोठे महापुरुष शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवतो. काही दिवसात भ्रष्टाचारामुळे, चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्याने मूर्ती पडते.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला. त्यांनी फक्त शिवाजी महाराजांची माफी मागू नये. राज्यातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे. मोदींना हे सांगितलं पाहिजे, तुम्ही फक्त दोनच माणसांचं सरकार का चालवता?? मोठी कंत्राट अदानी आणि अंबानीला मिळतात.

जिथे पाहाल तिथे भ्रष्टाचार आहे. बाहेरचे लोक इथे येऊन कंत्राट घेत आहेत. आपल्याला हे बदलायचं आहे. तुम्ही राज्यात जनतेचं सरकार आणणार आहात. शेतकरी, बेरोजगार आणि प्रत्येक वर्गाचं सरकार तुम्ही आणणार आहात. तुम्हाला जिथे गरज असेल मी येईल. तुम्ही फक्त ऑर्डर द्या!!

Rahul Gandhi targets Modi over apology issue, but didn’t take savarkar’s name!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात