विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकार वरील अविश्वास ठरावाच्या वेळी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी काल जे भाषण केले, त्यामध्ये त्यांनी “हत्या” शब्दापासून अनेक असंसदीय शब्द वापरले होते, ते सगळे शब्द लोकसभेतील रेकॉर्ड मधून हटविण्यात आले आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभा सचिवालयाला तसा आदेश दिला आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करून घेतली. Rahul gandhi speech in parliament word murder
राहुल गांधींनी कालच्या भाषणात मोदी सरकारवर भारतमातेची मणिपूरमध्ये हत्या केल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी मोदी सरकारला त्यांनी देशद्रोही, गद्दार भारत मा की आवाज मारने वाली सरकार अशा शेलक्या शब्दांनी संबोधले होते. “हत्या” शब्दाबरोबरच त्यांच्या भाषणातले “देशद्रोही”, “गद्दार”, “मारा गया” हे शब्द देखील लोकसभेच्या रेकॉर्डमधून हटविण्यात आले आहेत.
म्हणे, भारतमातेची हत्या; राहुल गांधींचे लोकसभेतले भाषण हा औचित्यभंग आणि कायद्याच्या कचाट्यात अडकणारे!!
लोकसभेच्या रेकॉर्डला कायद्याच्या पातळीवर विशिष्ट महत्त्व आहे. राहुल गांधींच्या भाषणाचे व्हिडिओ आज जरी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर उपलब्ध असले आणि ते यापुढे ही राहणार असले तरी लोकसभेच्या रेकॉर्डमधून जेव्हा त्यांच्या भाषणातले “हत्या”, “देशद्रोही”, “गद्दार”, “मारा गया” असे शब्द हटविले याचा अर्थ लोकसभेने आपले रेकॉर्ड क्लिअर केले असा धरला जाईल. त्याचवेळी राहुल गांधींचे भाषणातले आक्षेपार्ह संसदीय शब्द त्यातल्या संदर्भासह काढून टाकल्याने राहुल गांधी यांच्यावरची पुढची कारवाई टळल्याचे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App