विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार हरियाणातील पैलवानांच्या आखाड्याचा आज पोहोचले. ते तिथे आयत्यावेळी पोहोचल्याने पैलवानांना त्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे पैलवानांनी तिथल्याच मैदानातल्या मुळा उपटून राहुल गांधींना सादर केला. Rahul Gandhi reached the wrestlers area in haryana
कुस्तीगीर महासंघाच्या वादात हरियाणातील पैलवानांनी आपल्याला मिळालेली पदके आणि पद्मश्री सरकारला परत करण्याची घोषणा केली यामागे कोणतेही राजकारण नसल्याचा दावा पैलवानांनी केला तरी त्यातले राजकारण लपून राहिले नाही. सुरुवातीला प्रियांका गांधी आणि आता राहुल गांधी पैलवानांना भेटले.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिला पैलवानांनी मल्लांनी सातत्याने कारवाईची मागणी केली. त्यांनी यासाठी आंदोलनही पुकारले होते. ब्रजभूषण यांच्याविरोधात या सगळ्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. जेव्हा बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले, तेव्हा साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला, तर बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. विनेश फोगाटने अर्जुन अवॉर्ड आणि मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.
हे वातावरण तापलेले असतानाच राहुल गांधी यांनी हरियाणाचा पैलवान दीपक पुनिया याच्या झज्जर गावाचा दौरा केला आणि कुस्तीचे काही डावपेचही अनुभवले.
पण राहुल गांधी तिथे आयत्यावेळी पोचले त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पैलवान पुष्पगुच्छ ची व्यवस्था करू शकली नाहीत म्हणून पैलवानांच्या खुराकासाठी टिकल्यास मैदानात लावलेल्या पालेभाज्यांपैकी मुळा उपटून एका पैलवानाने राहुल गांधींना दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App