Operation sindoor च्या चर्चेत सरकारला धरले धारेवर; पण काँग्रेसमध्ये वजाबाकीचे राजकारण जोरावर!!

नाशिक : operation sindoor वरच्या संसदेतल्या चर्चेत सरकारला धरले धारेवर; पण काँग्रेसमध्ये वजाबाकीचे राजकारण जोरावर!!, असे म्हणायची वेळ राहुल गांधींच्या धोरणामुळे आली. शशी थरूर आणि मनीष तिवारी या दोन काँग्रेस खासदारांच्या बुद्धी कौशल्याचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगला करून घेतला त्यांना परदेश दौऱ्यामधल्या शिष्टमंडळांमध्ये समावेश केला. तिथे त्यांनी चांगली छाप पाडली पण राहुल गांधींना मात्र या दोन्ही नेत्यांचा पक्षाच्या दृष्टीने चांगला वापर करून घेता आला नाही. लोकसभेतल्या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी काँग्रेसच्या यादीतून या दोन्ही नेत्यांची नावे वगळली. Rahul Gandhi

त्यामुळे शशी थरूर मौनात गेले, पण त्यांचे मन फार बोलके ठरले, तर मनीष तिवारी यांनी “भारत का वासी हूं, भारत की बात सुनाता हूं” असे दोनच ओळींचे ट्विट करून काँग्रेसच्या नेतृत्वाला आपल्या राजकीय अस्तित्वाची जाणीव करून दिली.

एरवी राहुल गांधींना शशी थरूर आणि मनीष तिवारी या दोन political assets चा चांगला वापर करून सरकारला धारेवर धरता आले असते. हे दोन्ही खासदार जरी ऑपरेशन सिंदूरच्या बाजूने बोलले असते, तरी त्यांना अन्य विशिष्ट मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरायला देखील सांगता आले असते. मोदी सरकारच्या मुसद्देगिरी मधल्या उणीवा मांडायचा आग्रह धरता आला असता आणि तो त्यांना टाळताही आला नसता. परदेशांमध्ये शिष्टमंडळांमध्ये सामील होऊन आम्ही भारताबाहेर भारतासाठी एक आहोत, पण आम्ही सरकार बरोबर नाही. सरकारला प्रश्न विचारायला मागे पुढे पाहणार नाही, हा संदेश राहुल गांधींना सुद्धा देता आला असता, राहुल गांधींनी तो दिला नाही.



– प्रादेशिकांना जे जमले, ते…

त्याउलट ते स्वतःच मोदींसमोर मुत्सद्देगिरीत कमी पडले. सुप्रिया सुळे, कनिमोळी यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांना जे जमले, ते राहुल गांधींसारखे राष्ट्रीय नेत्याला जमू शकले नाही. सुप्रिया सुळे आणि कनिमोळी यांनी परदेशांमधल्या शिष्टमंडळांमध्ये भाग घेतला. त्यांचे नेतृत्व केले. भारताची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. पण सरकारला मात्र प्रश्न विचारायला त्यांनी कमी केले नाही. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाषण करताना ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम मधला हल्ला हे दोन वेगळे विषय असल्याचे सांगून पहलगाममधल्या सुरक्षाविषयक त्रुटींवर बोट ठेवले. त्यावर सरकारला जाब विचारला.

कनिमोळी यांनी देखील नेमकी हीच भूमिका अधोरेखित केली. भाजपचे वरिष्ठ खासदार बिजयंत पांडा यांनी नेमकेपणाने हाच मुद्दा सुचित केला. काँग्रेसने शशी थरूर यांच्यासारख्या प्रभावी वक्ताला बोलू द्यायला हवे होते. ते काही सरकारच्या बाजूने बोलले असते असे गृहीत धरायला नको होते, असे त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला सुनावून घेतले. राहुल गांधींच्या कमतर मुत्सद्देगिरी मुळे हे घडून येऊ शकले. राहुल गांधी जर politically mature वागले असते, तर मोदींना political assets चा वापर करता आला नसता आणि समजा त्यांनी केला असता, तरी खुद्द काँग्रेसला देखील त्याच political assets चा अधिक चांगला वापर करून सरकारला धारेवर धरता आले असते.

राहुल गांधी महाभारतातला “वयम पंचाधिकम शतम्” हा धडा शिकले नाहीत म्हणून त्यांना काँग्रेसमध्ये बेरजेचे राजकारण करता आले नाही. ते वजाबाकीचे राजकारण करून बसले.

Rahul Gandhi making politics of subtraction in congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात