विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही अजून काँग्रेस – राजद महागठबंधन किंवा भाजप महायुती जाहीर झालेली नाही म्हणजे त्यांचे जागावाटप झालेले नाही. तरीदेखील जिंकून येण्याच्या आणि पराभव करण्याच्या दाव्यांना उत आला असून त्यामध्ये निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी केलेल्या दाव्यामुळे भर पडली.Rahul Gandhi lost in Amethi, Tejashwi Yadav will lose in Raghopur
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघात पडले होते, स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. तसेच तेजस्वी यादव राघोपूर विधानसभा मतदारसंघात पराभूत होतील. मीच त्यांना पाडेन, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.
प्रशांत किशोर यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच संपूर्ण बिहार दोन-तीन वेळा ढवळून काढला. त्यांनी 243 मतदारसंघांमध्ये पोहोचून सभा घेतल्या. जनसुराज्य पक्षाच्या संघटना बांधणीचा प्रयत्न केला. त्यांनी एकाच वेळी सत्ताधारी भाजप महायुती आणि काँग्रेस राजद महागठबंधन यांना अंगावर घेतले. बिहारमध्ये आपणच किंगमेकर ठरू, असा दावा केला.
पण पलीकडे जाऊन प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांचा पराभव करण्याचा निर्धार केला. राघोपूर विधानसभा मतदारसंघ लालूप्रसाद यादव यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्या मतदारसंघातून स्वतःला लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव अनेकदा निवडून आले. त्याच राघोपूर मतदारसंघात उभा राहून यादव घराण्याला आव्हान देण्याचा प्रशांत किशोर यांचा इरादा आहे. त्यासाठी त्यांनी उद्या राघवपूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून कार्यकर्त्यांनी सल्ला दिला तर ते राघोपूर मधून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतील. म्हणूनच त्यांनी आज राहुल गांधीच जसे अमेठी लोकसभा मतदारसंघात पडले, तसेच तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघात हरतील, असा दावा केला. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याला धक्का बसला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App