बिहार मध्ये राहुल गांधींनी तलावात मारली उडी; निवडणूक प्रचार करण्याऐवजी केली मासेमारी!!

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहार मध्ये राहुल गांधींनी तलावात मारली उडी; निवडणूक प्रचार करण्याऐवजी केली मासेमारी!!, असला प्रकार आज बेगूसराय मधून समोर आला.Rahul Gandhi jumped into a lake in Bihar; went fishing instead of campaigning for the election!!

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधींनी मतदार अधिकार यात्रा काढून मोठी वातावरण निर्मिती केली पण ती मध्येच सोडून ते कंबोडियाला निघून गेले होते. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या काँग्रेस आणि राजद यांच्यात मतभेदाची दरी निर्माण झाली. शेवटी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बिहारमध्ये येऊन ती मिटवावी लागली. काँग्रेसला तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीला मान्यता द्यावी लागली. ती मान्यता घेतल्यानंतरच काँग्रेस आणि राजद यांचा एकत्रित प्रचार सुरू झाला. बिहारमध्ये दोन दिवसांमध्ये चार-पाच सभांमध्ये भाषणे केल्यानंतर राहुल गांधींचा मूड गेला.



– मुकेश सहानी आणि कन्हैया कुमार यांचीही तलावात उडी

आणि आज त्यांनी बेगूसराय मध्ये भाषण करण्याऐवजी तिथे असलेल्या तलावातच थेट उडी घेतली. तिथल्या स्थानिक मच्छीमारांसमवेत मासेमारी केली. यावेळी राहुल गांधी यांच्या समावेत महागठबंधनचे उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार मुकेश सहानी आणि काँग्रेसचे तरुण नेते कन्हैया कुमार होते. राहुल गांधींनी तलावात उडी घेतलेली पाहताच त्या दोघांनी सुद्धा तलावात उडी मारली.

राहुल गांधींनी बिहारमध्ये कन्हैया कुमार यांचा चेहरा पुढे आणायचा फार प्रयत्न केला, पण तेजस्वी यादव यांनी त्यामध्ये यशस्वीरित्या खोडा घातला. त्यामुळे कन्हैया कुमार यांचे बिहारमध्ये फारसे राजकीय तेज चालले नाही ते राहुल गांधींच्या मागे सावलीसारखे फिरायला लागले आज जेव्हा राहुल गांधींनी तलावात उडी घेतली त्या पाठोपाठ कन्हैया कुमार यांनी सुद्धा तलावात उडी घेतली आणि राहुल गांधी यांच्या समवेत मासेमारी केली.

राहुल गांधींनी बिहारच्या जनतेला यातून प्रतीकात्मक संदेश दिला, चा दावा त्यांच्या समर्थक विश्लेषकांनी केला. पण त्याचे प्रतिबिंब निकालात पडेलच याची कुठलीही गॅरंटी द्यायला त्यांनी नकार दिला.

Rahul Gandhi jumped into a lake in Bihar; went fishing instead of campaigning for the election!!

महत्वाच्या बातम्या


	Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात