विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rahul Gandhi : राहुल गांधी हे स्वतःच्या सुरक्षित बाबत गंभीर नसल्याची तक्रार सीआरपीएफने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. राहुल गांधी यांनी सुरक्षा विषयक प्रोटोकॉलचे उल्लंघन केले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांना केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत Z+सुरक्षा पुरवली जाते. राहुल गांधीला Advanced Security Liaison (ASL) सोबत पुरवली जाणारी Z+सुरक्षा व्यवस्था ही देशातील सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्थेपैकी एक आहे. या सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत 55 जवान संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. जीवाला धोका असलेल्या महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या सुरक्षेसाठी ची सुरक्षा व्यवस्था असते. या सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत एखाद्या ठिकाणाला भेट देण्या अगोदर संबंधित ठिकाणाबद्दल माहिती सुरक्षा व्यवस्थेला देणे बंधनकारक असते. पण राहुल गांधी ती माहिती देत नसल्याची तक्रार सीआरपीएफने केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात व्ही व्ही आय पी सेक्युरिटी चीफ सुनील जुने यांनी राहुल गांधी स्वतःच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याची तक्रार केली आहे. राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्थेला याची माहिती देत नाहीत अशी याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी राहुल गांधीच्या इटली, व्हिएतनाम, दुबई, लंडन आणि मलेशिया दौऱ्याबाबत सुरक्षा व्यवस्थेला पूर्व सूचना देण्यात आली नसल्याची तक्रार केली आहे.
अशा प्रकारची तक्रार करावी लागणे हे नवीन नाही. यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची तक्रार सीआरपीएफने केली आहे. 2022 मध्ये राहुल गांधी यांनी 113 वेळा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची तक्रार करण्यात आली होती. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सुद्धा अनेकदा सुरक्षा विषयक नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले होते.
2023 मध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कश्मीरमध्ये पोचले असता कश्मीर खोऱ्यात ते लोकांच्या गर्दीत अडकल्यामुळे 30 मिनिट त्यांचा ताफा रखडला होता. यावरून काँग्रेसने सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्याची बोलले होते. काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेत राहुल गांधीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.
आता सीआरपीएफने लिहिलेल्या पत्रामुळे राहुल गांधी आपल्या सुरक्षा बाबत गंभीर होतील का हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांना काही सल्ला देतील का हे पहावे लागेल. राहुल गांधी आणि अपेक्षित पणे गर्दीतील लोकांना भेटतात किंवा एखाद्या ठिकाणी पूर्व सूचना न देता थांबतात त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण येतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App