राहुल गांधी म्हणजे पावसाळ्यातला बेडूक, फक्त निवडणुका आल्या की बिहारमध्ये येतात; प्रशांत किशोर यांचे शरसंधान!!

Prashant Kishor

वृत्तसंस्था

पाटणा : लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बिहार मधल्या मतदार यादीच्या मुद्द्यावर संपूर्ण देशभर गाजावाजा केला निवडणूक आयोगापासून ते भाजप पर्यंत सगळ्यांना ठोकून काढले. पण राहुल गांधी नेमके काय आहेत??, याची पोल प्रशांत किशोर यांनी खोलली.Rahul Gandhi is a frog in the monsoon, he only comes to Bihar when elections are around; Prashant Kishor’s sarcasm!!

राहुल गांधी म्हणजे पावसाळ्यातले बेडूक आहेत. पावसाळा आला की बेडूक बाहेर येतात, तसे निवडणुका आल्या म्हणजेच राहुल गांधी बिहारमध्ये येतात. ते बिहारमध्ये एक दिवस किंवा एक रात्र देखील कधी राहिले नाहीत, पण आता त्यांना लोकांची मतं पाहिजेत म्हणून ते बिहारमध्ये चकरा मारत आहेत, असे टीकास्त्र प्रशांत किशोर यांनी सोडले.



राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बिहारमध्ये पदयात्रा काढणार आहेत. त्यांच्या पदयात्रेची खिल्ली प्रशांत किशोर यांनी उडवली. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना बिहार मधले लोकं खूप वर्षापासून पाहत आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बिहारमध्ये प्रवास करोत, पदयात्रा काढोत किंवा हेलिकॉप्टर यात्रा काढोत त्याने काही फरक पडणार नाही. बिहारी जनता त्यांचे ढोंग ओळखून आहे. राहुल आणि तेजस्वी बिहार मध्ये येऊन लोकांची मतं मागतात, पण दिल्लीत जाऊन बिहारी लोकांची खिल्ली उडवतात. बिहारी लोकांना दिल्ली महाराष्ट्र आणि तेलंगणात लोक शिव्या घालतात त्यांना मारहाण करतात त्यावेळी राहुल गांधी यांची झोप उडत नाही बिहारी लोकांना मारहाण होताना राहुल गांधी झोपा काढतात पण निवडणुका आल्या की पावसाळ्यातल्या बेडका प्रमाणे बिहारमध्ये येऊन उगवतात, असे शरसंधान प्रशांत किशोर यांनी साधले.

Rahul Gandhi is a frog in the monsoon, he only comes to Bihar when elections are around; Prashant Kishor’s sarcasm!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात