Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवणाऱ्या राहुल गांधींनी सावरकरांचा एका मुलाखतीत पुन्हा अपमान केला. त्यांच्या कथित माफीनाम्यावरून नवे दावे करून इतिहासाची मोडतोड केली. Rahul Gandhi

काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित यांना दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींनी पंडित नेहरूंचे री ब्रॅण्डिंग केले. महात्मा गांधींचे वैशिष्ट्य असलेले सगळे शब्द त्यांनी पंडित नेहरूंना जोडून टाकले. पण त्यापुढे जाऊन राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला. ब्रिटिशांविरुद्ध देशातले लाखो लोक लढले. ते तुरुंगात गेले. त्यांनी बलिदान केले. पण सावरकरांना त्यांच्याच स्थान नाही. कारण त्यांनी माफीनाम्यावर स्वाक्षरी केली. ब्रिटिशांनी त्यांना वाकविले. पण ब्रिटिश महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल सुभाष चंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर यांना वाकवू शकले नाहीत. शेवटी सगळ्या विरोधाला मोडून उभा राहू शकतो त्याला नेता म्हणतात सावरकर त्या निकषात बसत नाहीत, असा दावा राहुल गांधींनी या मुलाखतीत केला.

सावरकरांनी मनातल्या काळ कोठडीत अकरा वर्ष भोगलेले कष्ट आणि त्यांच्या कथित माफीनाम्याची सर्व पार्श्वभूमी सांगण्याचे कष्ट देखील राहुल गांधींनी घेतले नाहीत. पण त्यापलीकडे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंना नाभा जेल मधून सोडवून आणताना पंडित मोतीलाल नेहरू यांनी ब्रिटिशांना माफीनामाच लिहून दिला होता हे सत्य देखील राहुल गांधींनी या मुलाखतीत सांगितले नाही. पण आपण फार मोठे तत्त्वज्ञान मांडतो आहोत, अशा थाटात त्यांनी संदीप दीक्षित यांना मुलाखत देऊन सावरकरांचा अपमान केला. संदीप दीक्षित यांच्यासारख्या उच्चशिक्षित माजी खासदाराने देखील राहुल गांधींसमोर माना हलविण्यात धन्यता मानली.

Rahul Gandhi insults Savarkar again

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात