नाशिक : राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!, असे बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मध्यावर घडले. Rahul Gandhi
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी एकत्रित रॅली करून काँग्रेस राजद महागठबंधनच्या प्रचारात मोठी आघाडी घेतली. या रॅलीमध्ये त्या दोघांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जबरदस्त प्रहार केले. पण राहुल गांधींनी तसे प्रहार करताना सगळ्या राजकीय मर्यादांची पायमल्ली केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “नाचणारा” म्हटले, तर छठमैय्याचा सुद्धा “नौटंकी” म्हणून अपमान केला. वास्तविक राहुल गांधींच्या भाषणात बरेच वेगळे मुद्दे सुद्धा होते. काँग्रेस आणि राजद यांनी निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करून सत्ताधारी आघाडीवर मात सुद्धा केली होती. परंतु, प्रचारात घेतलेली आघाडी त्यांना टिकवता आली नाही. राहुल गांधींनी मोदींचा केलेला अपमान आणि छठमैय्याला नौटंकी म्हटल्याने बिहारच्या विधानसभा निवडणुकीत तोच मुद्दा नेमका तापला.
– मोदींचे युवराजांवर प्रहार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुजफ्फरपूरच्या आजच्या रॅलीत नेमका तोच मुद्दा उचलला. काँग्रेस आणि राजद यांचे युवराज मोठे नामदार आहेत. ते कामदारांचा अपमान अपमान करणे हा जन्मसिद्ध अधिकार मानतात. गरीब घरातला एक चहावाला पंतप्रधान झाला हे त्यांना सहन झालेले नाही. म्हणून ते माझा नेहमीच अपमान करतात पण आज तर त्यांनी छठमैय्याला नौटंकी म्हणून अपमानित केले. हा अपमान बिहारची जनता सहन करेल का??, बिहारची जनता त्यांना धडा शिकवणार नाही का??, असे तिखट सवाल पंतप्रधान मोदींनी केले. त्यावर जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन काँग्रेस आणि राजद या दोन्ही पक्षांना धडा शिकवणार असल्याचे सांगितले.
– राहुल गांधींचे नेहमीच फाऊल
राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आत्तापर्यंत अनेकदा टीकेचा रोख भलतीकडेच वळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य नेत्यांना आयते मुद्दे हाताशी दिले. गुजरात विधानसभा निवडणुकीत मणिशंकर अय्यर नरेंद्र मोदींना “नीच” म्हणाले. त्यामुळे तिथली निवडणूक जातीच्या अपमानाच्या मुद्द्याकडे वळली होती. मोदींनी त्या मुद्द्याचा चपखल वापर करून गुजराती अख्खी निवडणूक फिरवून दाखवली होती. पण त्यातून राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते काही शिकले नाहीत. त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्हा तीच चूक केली. त्यांनी मोदींबरोबरच छठमैय्याचा देखील अपमान केला. त्यामुळे नरेंद्र मोदींना आणि भाजपच्या नेत्यांना काँग्रेस आणि राजद यांच्यावर यांना ठोकून काढायची आयती संधी मिळाली. ती पंतप्रधान मोदींनी आज मुजफ्फरपुर आणि छपरा इथल्या जाहीर सभांमध्ये साधून घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App