काँग्रेस आणि पवारांचे आता “विरोधी ऐक्य विसरा, आधी स्वतःचे पक्ष सावरा” धोरण!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली/ मुंबई : काँग्रेस आणि शरद पवारांचे आता विरोधी ऐक्य विसरा, आधी स्वतःची पक्ष सावरा!!, अशा राजकीय हालचाली सुरू आहेत. काँग्रेसने महाराष्ट्रातला आपला पक्ष फुटू नये म्हणून ताबडतोब हालचाल करत राजधानी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या समावेत राहुल गांधी उपस्थित राहिले. Rahul Gandhi hold a meeting with leaders of Maharashtra Congress

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष संघटनेत लवकर फेरबदल करून पक्ष सावरण्याच्या दृष्टीने या या बैठकीत चर्चा झाली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पवारांच्या करड्या नजरेखालचा पक्ष फुटला तर आपले काय होईल?, या धास्तीने काँग्रेस नेते राजकीय दृष्ट्या जीव मुठी धरून दिल्लीत गेले. महाराष्ट्रात नाना पटोले यांच्या हाती पक्ष “सुरक्षित” नाही, अशी भावना अनेक काँग्रेस नेत्यांनी “तिथे” व्यक्त केल्याचे समजते.

महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचा पेचप्रसंगाचा मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी एकत्रित चर्चा करून मिटवणार आहेत. पण हा पेच प्रसंग मिटवल्यानंतरही महाराष्ट्रातली काँग्रेस एकच राहील पक्ष फुटणार नाही, याची कोणी गॅरेंटी घेत नाही.

छगन भुजबळ सॉफ्ट टार्गेट

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित दादांबरोबर गेलेल्या बाकी कुठल्या नेत्याला टार्गेट करण्याआधी सॉफ्ट टार्गेट म्हणून छगन भुजबळ यांना टार्गेट केले. भुजबळांच्या येवल्यात सभा घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यावर कॉन्सन्ट्रेट करत शरद पवारांनी नाशिक जिल्ह्यातल्या आपल्या समर्थक नेत्यांच्या वन टू वन बैठका सुरू केल्या. निवडणुकीपूर्वी नाशिक जिल्ह्यात आपल्या गटाच्या नव्या नेमणुका करून ते निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीला लागले. नाशिक जिल्ह्याने आपल्याला कायम साथ दिली असा पवारांचा दावा आहे, पण संपूर्ण साथ 1980 ते 85 एवढीच टिकली. 1990 नंतर नाशिक जिल्ह्याने शिवसेना-भाजप या हिंदुत्ववादी पक्षांना कौल दिला, याकडे शरद पवारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले.

बारामतीत सेफ गेम

शरद पवार सध्या पुणे जिल्ह्यात हात घालत नाहीत तर त्यांनी नाशिक जिल्ह्यावर कॉन्सन्ट्रेट केले आहे. यात बऱ्याच गोष्टी बोलक्या आहेत एकतर पवार कुटुंब एकमेकांविरोधात उमेदवार देणार नाही. त्यातून बारामती त्यांनी “सेफ” ठेवले आहे. राष्ट्रवादीत काय व्हायचे ते होवो पवार कुटुंबात काही होता कामा नये याची काळजी दोन्ही बाजू घेणार असल्याचे स्वतः रोहित पवारांनी सांगितले. म्हणूनच पवारांनी पुणे जिल्ह्यात अजितदादा समर्थकांना हात लावण्याऐवजी नाशिक जिल्ह्यात भुजबळांना हात लावला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या संघटनेत फेरबदल करण्यासाठी पवारांनी आपल्या समर्थक नेत्यांच्या वन-टू-वन बैठका सुरू केल्या.

पण या सगळ्यात काँग्रेस आणि पवार हे विरोधी ऐक्याचे दोन महत्त्वाचे घटक मूळ विरोधी ऐक्याचा विषयच विसरावा लागला आणि तो बाजूला ठेवून स्वतःचाच पक्ष सावरण्यासाठी आता त्यांना शक्ती खर्च करावी लागत आहे.

Rahul Gandhi hold a meeting with leaders of Maharashtra Congress

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात