नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात इंदिरा भवन मध्ये पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्यांदा vote chori चे प्रेझेंटेशन केले. याआधी त्यांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वोट चोरी झाली, असा आरोप करणारे मोठे प्रेझेंटेशन केले होते. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हरियाणा मध्ये वोट चोरी करून भाजपचे सरकार आणले गेले, असा आरोप केला.Rahul Gandhi gets “prolonged” support from the rest of the opposition
राहुल गांधींनी वोट चोरीची एकूण दोन प्रेझेंटेशन्स केली. त्यांच्या पाठोपाठ त्यांची कॉपी मारत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या वोट चोरीचे प्रेझेंटेशन केले. राहुल गांधींची दोन प्रेझेंटेशन्स आणि आदित्य ठाकरेंचे एक प्रेझेंटेशन अशा 3 प्रेझेंटेशन्सना माध्यमांनी भरपूर प्रमाणात प्रसिद्धी दिली.
– आदित्य ठाकरेंकडून कॉपी, पण…
पण विरोधी पक्षांच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी आणि त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी राहुल गांधी यांना “लांबूनच” म्हणजे हाताचे अंतर राखून पाठिंबा दिला. राहुल गांधींच्या पहिल्या प्रेझेंटेशन नंतर सोनिया गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला विरोधी पक्षांचे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासारखे सगळे मोठे नेते गेले, पण नंतर मात्र त्यांच्या प्रेझेंटेशनला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. राहुल गांधींची प्रेझेंटेशनची कॉपी फक्त आदित्य ठाकरे यांनी मारली. पण सुप्रिया सुळे, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, उदय निधी आदी नेत्यांनी राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनला लांबून पाठिंबा दिला पण त्यांनी स्वतः कुठले वोट चोरीचे प्रेझेंटेशन केलेले दिसले नाही. सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनचा विषय आहे पार्लमेंट मध्ये उचलून एवढेच सांगितले. पण त्यांनी स्वतः किंवा त्यांचे शिलेदार रोहित पवारांनी स्वतः वोट चोरीचे कुठले प्रेझेंटेशन सादर केले नाही.
– किरकोळ “बाईट” वर बोळवण
त्यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वावर या विरोधी नेत्यांचा सर्वस्वी विश्वास नाही. ठेवायचा म्हणून वरवर विश्वास ठेवायचा, असेच राजकीय चित्र यातून दिसून आले. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आमदार उत्तम जानकर यांनी मोठा प्रतिसाद दिला होता, पण नंतर त्यांचा प्रतिसादही थंडावत गेला. राहुल गांधींच्या आजच्या प्रेझेंटेशन नंतर तर भाजपच्या नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या, पण राहुल गांधींच्या समर्थनासाठी कुठल्याही मोठ्या विरोधी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतल्याचे दिसले नाही. उलट विरोधी पक्षांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी पत्रकारांना बाईट देऊन त्यांचे बोलवण केलेली दिसले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App